आषाढी एकादशी 2021: Aashadhi Ekadashi 2021
आषाढी एकादशी २०२१ :Aashadhi Ekadashi 2021

आषाढी एकादशी 2021: Aashadhi Ekadashi 2021

आषाढी एकादशी 2021

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी.

यंदा आषाढी एकादशी मंगळवार, 20 जुलै रोजी आहे. या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरची चालत वारी करतात. मात्र हा मोठा सोहळा यंदाही कोविड-19 संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. 

देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात.

अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

 भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशायनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. 

देवशायनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागी होतात.

हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो.

देवशयनी एकादशीचे महत्व

भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही.

 त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.

दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते.

निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते.

या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत.

म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चतुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात.

आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते.

म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.

या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

वारी म्हणजे एखाद्या विशिष्ट (धार्मिक) ठिकाणी नियमित भेट.

आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

“अवघे गरजे पंढरपुर . . . अवघे गरजे पंढरपुर . . . चालला नामाचा गजर”

आषाढी एकादशी यात्रा पंढरपूर

“माझे माहेर पंढरी . . . आहे भिवरेच्या तिरी”

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे.

शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो.

द्वादशीलाच व्रत पारण करणे महत्त्वाचे

एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात.

एकादशीचे व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते.

द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे.

जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते.

द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप करण्यासारखे आहे.

|| जय जय रामकृष्ण हरी ||

Follow us Facebook

Leave a Reply