अक्षय तृतीया २०२१:Akshay Tritiya 2021
Akshay Tritiya 2021:अक्षय तृतीया 2021

अक्षय तृतीया २०२१:Akshay Tritiya 2021

अक्षय तृतीया चे महत्त्व

अक्षय तृतीया.. .साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असा हा दिवस!

आखाजी…अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा आणि दान केलेल्या गोष्टीचा क्षय होत नाही असे म्हणतात.

त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व म्हटले जाते.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करतात .

अक्षय तृतीया का साजरी करतात ?

अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत श्री गणेश कडून लिहून घेण्यास सुरुवात केली.

VedVyas and Shri Ganesha
Vedvyas and Shri Ganesha

श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते. परशुराम ने ऋषी जमदाग्नि आणि माता रेणुका देवी च्या घरी जन्म घेतला होता. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू ची पण पूजा करतात.

भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीरास सांगितले की,

“या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे.

देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते..”

 या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.

नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.

ह्याच दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वी वर अवतरली होती. राजा भगीरथ ने गंगा ला धरती वर आणण्यासाठी हजारो वर्ष तपचर्या केली होती. ह्या दिवशी पवित्र गंगा मध्ये डुबकी लावल्याने सगळे पाप नष्ट होतात.

भगवान शंकर ने ह्या दिवशी भगवान कुबेरला माता लक्ष्मी ची पूजा करण्यास सांगितले होती त्यानंतर हि परंपरा आज तायात सुरु आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडव पुत्र युधिष्टिर ला अक्षय पात्र भेटले होते. याचे महत्व हे होते कि, यातले भोजन कधीही संपत नव्हते .

वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.

अक्षय तृतीया 2021 मुहूर्त

अक्षय तृतीया पूजेसाठी शुभ वेळ म्हणजे पहाटे 05:38 ते दुपारी 12:18 पर्यंत. पूजेचा एकूण कालावधी 6 तास 40 मिनिटे असेल.

अक्षय तृतीयावर सोन्याची खरेदी करण्याची वेळ 14 मे 2021 रोजी सकाळी 05:38 वाजता सुरू होईल आणि 15 मे 2021 रोजी सकाळी 05:30 वाजता संपेल.

Follow us Facebook

Leave a Reply