घटस्थापना, नवरात्री : GhatSthapana, Navratri
घटस्थापना-Ghatsthapana

घटस्थापना, नवरात्री : GhatSthapana, Navratri

नवरात्री

‘पुत्रान देही, धनं देही, देही सर्व कामांश्‍च देही में।

रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही।। ‘

हा दुर्गादेवीचा आधारभूत मंत्र मानला जातो.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरवात होते.

नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी/ दसरा म्हणतात.

सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात.

आश्विन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यात देखील देवीचं नवरात्र असून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असतं.

आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते.

ही तेज स्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात.

या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात.

या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते.

नवरात्री दरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात.

आश्‍चिन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र.

श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत.

आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते.

बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे. तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.

या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

1. शैलपुत्री
2. ब्रह्मचारिणी
3. चन्द्रघंटा
4. कूष्मांडा
5. स्कंदमाता
6. कात्यायनी
7. कालरात्रि
8. महागौरी
9. सिद्धिदात्री

या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात.

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

नवरात्रीत घटस्थापना का करतात

घटस्थापना नवरात्रीमध्ये खूप महत्वाची आहे. घटस्थापनेने नवरात्रीची सुरुवात होते. कलशची स्थापना शुभ मुहूर्तावर केली जाते.

कलश सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शुभता देणारा मानला जातो.

कलशच्या तोंडात भगवान विष्णू , गळ्यात रुद्र, मुळामध्ये ब्रह्मा आणि मध्यभागी शक्ती असल्याचे मानले जाते.

नवरात्रीच्या वेळी, विश्वात उपस्थित असलेल्या शक्तींना घटात बोलावले जाते आणि सक्रिय केले जाते.

यासह, घराच्या सर्व हानिकारक तरंग नष्ट होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

घटस्थापना

।। जगदंब ।। जगदंब ।।

धन्यवाद!

Follow us Facebook

Leave a Reply