अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्री दत्तात्रेय आणि त्यांचा शिष्य राजा अलर्क

अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य

अलर्क

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुरामयदुराजा, अलर्क राजा, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात.

या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे. 

या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.

मागच्या लेखात आम्ही यदुराजा, परशुराम  कसे दत्तात्रेयांचे शिष्य झाले ते पाहिले आज आपण अलर्क राजा ला कसे शिष्य केले ते सांगितले आहे.

राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो.

त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते.

राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता.

त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता.

कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला.

प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले.

त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली.

आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले.

यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले. त्याने काशिराजाशी संपर्क साधला.

त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले.

इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली.

अशा वेळी अलर्काला अतिशय दुख झाले, अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती.

तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की,

” जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. “

अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला.

त्यावरील संदेश त्याने वाचला.

सर्व संकटाचे मूळ कारण कामना आहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी.

सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे.

ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत.

तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.

श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली.

त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, आपण दोघेही एक आहोत.

तेव्हा हे राज्य तूच सांभाळ असे त्याने सुबाहूला विनविले, सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे.

त्याने अलर्काला सांगितले की,” तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ.

राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर.”

या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला.

श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले.

आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.

Follow us Facebook

Leave a Reply