पंढरपूरची वारी : Pandharpur Wari
पंढरपूरची वारी- Pandharpur Wari

पंढरपूरची वारी : Pandharpur Wari

पंढरपूरची वारी

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.

पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात.

वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी.

या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.

वारी हा एक आनंद सोहळा असतो.

वारी म्हणजे काय ?

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.

ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.

वारीचे प्रकार

वारीचे दोन प्रकार आहेत.

  1. आषाढी वारी – सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.
  2. कार्तिकी वारी – संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
  3. या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.

संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.

वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.

तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.

एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.

जो नियमित वारी करतो तो वारकरी.

वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात.

वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.

वारकरी

’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत,

अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.

त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.

boAt Rockerz 255 Bluetooth Wireless in Ear Earphones with Mic (Active Black)

माळकरी/वारकरी

वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.

आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.

‘स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.

नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा.

भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा.

पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.

सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे.

परोपकार आणि परमार्थही करावा.

जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे’ असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.

वारकरी महावाक्य-

वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना..

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

असा जयघोष केला जातो.

स्थानपरत्वे या जयघोषात “पंढरीनाथ ‘भगवान’ की जय” असा भेद आढळतो.

या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.

वारीचा इतिहास

पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.

तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.

त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.

ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.

हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.

संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.

ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला;

परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच.

भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते.

पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी :-

हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.

तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.

श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे.

या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.

पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे.

सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.

संत तुकाराम महाराजांची पालखी :-

तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते.

त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती.

स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत.

तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.

वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत.

निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.

ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.

पालखी रथ

हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते.

Roll over image to zoom in OnePlus Smart Band: 13 Exercise Modes, Blood Oxygen Saturation (SpO2), Heart Rate & Sleep Tracking, 5ATM+Water & Dust Resistant( Android & iOS Compatible)

ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात.

खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते.

यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.

या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात.

तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते.

एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.

वारीचे /पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये

रिंगण-
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.

कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते.

रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.

मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात.

यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने “माऊलीचा अश्व” असे म्हणतात.

या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.

धावा-
धावा म्हणजे धावणे.

असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले.

याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

परतवारी

वारी सगळ्यांनाच माहीत आहे.

मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.

वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात.

मात्र ‘ परतवारी ‘च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो.

वारीला ग्लॅमर आहे, तर ‘ परतवारी’ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण.

संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) ‘संतकृपा जाली । इमारत फळा आली’ ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,.

संत कृपा झाली । इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवें रचिला पाया । रचियेलें देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥
भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥५॥

|| जय जय राम कृष्ण हरी ||

Fire-Boltt Ninja 2 SpO2 Full Touch Smartwatch with 30 Workout Modes, Heart Rate Tracking, and 100+ Cloud Watch Faces, 7 Days of extensive Battery (Black) Follow us Facebook

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Ketan Kumar

    जय जय राम कृष्ण हरी…