श्री गजानन महाराज पुण्यतिथी : Shree Gajanan Maharaj Punyatithi
श्री गजानन महाराज पुण्यतिथी : Shree Gajanan Maharaj Punyatithi

श्री गजानन महाराज पुण्यतिथी : Shree Gajanan Maharaj Punyatithi

श्री गजानन महाराज पुण्यतिथी

शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास। भाद्रपद शुद्ध पंचमीस। गुरुवारी प्रहर दिवसाला ।।३१३।।
प्राण रोधीता शब्द केला । जय गजानन ऐसा भला। सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवा माझारीं ।।३१४।।
                                                        — अध्याय १९ वा.

भाद्रपद शु. पंचमी, (ऋषि पंचमी)  श्री ऋषीपंचमी शके १८३२, अर्थात ८ सप्टेंबर १९१० या दिवशी श्रींनी संजीवन समाधी ग्रहण केली.

हा दिवस श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो.

ह्या वर्षी २०२२ मध्ये श्री गजाजन महाराजांची 112 वी पुण्यतिथी आहे आणि ती १ सप्टेंबर रोजी आहे.

या उत्सवाप्रसंगी भाद्रपद शु. १ ते ५ श्रींच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये श्री गणेशयाग व वरुणयागाचे आयोजन करण्यात येते. 

  “श्रीं संत गजानन महाराज”चा प्रकट होण्याचा प्रसंग

माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजे दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. तो दिवस शनिवार होता.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात वटवृक्षाखाली माध्यान्ह वेळी ऐन तारूण्याअवस्थेत एकदम प्रगट झाले.

उष्ट्या पत्रावळीतील भातशेते निजलीलेने वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत यांना श्री गजानन महाराज दिसले.

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.

महाराजांबद्दल थोडक्यात माहिती

गजानन महाराजांच्या जीवनातील विविध पैलू ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ या ग्रंथात संकलित केले आहेत. हा ग्रंथ दास गणु यांनी लिहिला आहे.

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने “आंध्रा योगुलु” नावाच्या पुस्तकात लिहिले आहे. 

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. 

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवात व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे.

उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.

“गण गण गणात बोते” आणि “जय गजानन” चा गजर

समाधीस्थळ

गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन समाधी घेतली जी एखाद्याच्या शारीरिक शरीरातून ऐच्छिक माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते.

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात गजानन महाराजांची समाधी आहे.

दररोज सुमारे २५ ते ३० हजार लोक इथे दर्शनासाठी येतात.

व्हीआयपींसाठी वेगळी काहीही व्यवस्था नसलेले हे भारतातले एकमेव समाधीस्थळ आहे.

महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी सर्वांनाच रांगेत उभे राहावे लागते.

जिथे गजानन महाराजांनी समाधी घेतली तिथे आज भव्य मंदिर आहे.

या 32 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक चमत्कार केले आणि शेगाव येथे गजानन महाराज आजही आपल्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्यांसमोर प्रकट होतात.

ते खरोखर कुठून आले हे कोणालाच माहीत नाही.

मंदिराच्या परिसरात गजानन महाराजांच्या प्रतिमेशिवाय समाधीस्थळ, पादुका, महाराजांचा चिमटा, इतर वस्तू, चिलीम ओढण्याची जागा (जे आजही गरम असते) आणि प्राचीन हनुमान मंदिर आहे.

असंख्य सेवक शिस्तबद्ध पद्धतीने मंदिराची व्यवस्था सांभाळतात.

!!स्पर्श तया भक्तीचा होताच होतो जीवाचा उद्धार !!
!!तो नायक ब्रम्हांचा तयां चरणी नमस्कार !!
!! गण गण गणांत बोते !!
!! जय गजानन !!
!! श्री गजानन !!

Shree Sakal Sant Gatha -Part 1 & 2 (श्री सकल संत गाथा – भाग १ व २ ) Follow us Facebook

Leave a Reply