श्री गुरुचरित्र : Shri Gurucharitra
श्री गुरुचरित्र : Shri Gurucharitra

श्री गुरुचरित्र : Shri Gurucharitra

श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते.

पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा.

श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली.

तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.

म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.

वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे.

काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे.

विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.

पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, “दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या.”

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते.

या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे.

यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे.

‘गुरुचरित्रा’ची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही.

भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधरांच्या हातची ‘गुरुचरित्रा’ची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये; म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आले;

कै. रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, परोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामीप्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या.

या प्रतीच्या आधारेच त्यांनी ‘गुरुचरित्रा’ची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली.

पारायणाची फलश्रुती

कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच.

तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते.

तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनिषा असते.

आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ-आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते.

या सर्व गोष्टी ग्रंथपठण-पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात.

दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते.

श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे.

तर ती अशी (१) त्रिपदा गायत्रीमंत्राचे पठण (१०८ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप) करावे, तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्रीमंत्र असा,

‘ॐ भू:ॐ भुव:ॐ स्व: मह:ॐ जन ॐतप: ॐसत्यम ॥१॥
ॐ तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात ॐ ॥२॥,
ॐ आपोज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भव: स्वरौम ॐ विष्णवे नम: ॥३॥

मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते.

दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण-श्रवण-लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की, बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात.

चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्त्व (उपस्थित) कळून येते.

त्यामुळे आपण मन-बुद्धी-शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान-अनुसंधान करावे. तसेच बाधानिरसनही होते.

सप्ताह पद्धती

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे.

याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे 

१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय 
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय 
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय 
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय 
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय 
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय 
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय


श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे.

ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम

  • वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
  • वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
  • वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
  • श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
  • सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
  • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
  • वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
  • सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
  • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती 

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

श्री गुरुचरित्रातील अध्यायतील फलश्रुती 
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २०, ओवी ५ वी 

★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

श्री गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते

१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. 
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. 

।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

Glory Sarees Women’s Banarasi Saree

Leave a Reply