अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी:Akkalkot Swami Samarth Maharaj Punyatithi
Akkalkot Swami Samarth Maharaj: अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी:Akkalkot Swami Samarth Maharaj Punyatithi

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. 

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केले.

सबसे बडा गुरू…

गुरूसे बडा गुरू का ध्यास… 

और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज…

तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले.

प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी धारणा आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.

ह्या वर्षी म्हणजे २०२१ साली महाराजांची पुण्यतिथी ९ मे म्हणजे रविवारी आहे.

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज समाधी

नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले…

 तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुध्दा स्वामींच्या अस्तिवाची साक्ष देत उभा आहे. याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे, या वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे, जेथे परब्रह्म विसावा घेत असे.

आज हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तिवांचे आणि अगाध शक्तींचे गुणगात गात दिमाखाने डौलत उभा आहे. 

भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वंयपुर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच ‘।।श्री स्वामी समर्थ।।’ हे नाव शोभून दिसते.

अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत आणि पवित्र पावन झालेले अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारुपास आलेले आहे.

“जे अनन्य भावाने मला शरण येतात, त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो.”
स्वामी नाम सदा मुखी वसो. स्वामी कमलचरणी मम नित्य प्राणविसावा मिळतो.
स्वामी कमलचरणी विसावुन तरी पाहा तुम्ही सर्व प्रचिती येतसे स्वामी अभय वचनाची
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

Follow us Facebook

Leave a Reply