श्री सोमनाथ मंदिर : Shri Somnath Temple
सोमनाथ:Somnath

श्री सोमनाथ मंदिर : Shri Somnath Temple

श्री सोमनाथ मंदिर

’ सोमनाथ’ हे १२ ज्योतिर्लिंग मधले पहिले ज्योतिर्लिंग. सौराष्ट्र या नववरुन त्यास सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले. 

 सोमनाथ म्हणजे, चंद्र(सोम) देवाचा नाथ . 

|| सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम् |

भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ||

या जयघोषांनी गुजरात मधील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदराचा आणि प्रभासपट्टण या गावाभोवतातलं चा सारा आसमंत दुमदुमून जायचा.

WOW Life Science Omega-3 Capsules, 60 Capsules


त्यातच मंदिरघाटाच्या पायऱ्यांवर आपटणाऱ्या समुद्राच्या लाटांतून निघणारा “जय शंकर ,जय शंकर ” हा घनगंभीर आवाज आणि मंदिराच्या तटावरील त्या प्रचंड सुवर्ण घंटेतून निघणारे “ओम नमः शिवाय” या मंत्राचा निंद्य मिसळून तो सारा परिसर भारावून जायचा!

जुने-सोमनाथ-मंदिर-Old-Somnath-Temple
जुने-सोमनाथ-मंदिर-Old-Somnath-Temple

मंदिराची घंटा अजस्त्र सुवर्णघन्टा सुमारे दोनशे मण वजनाच्या सोन्याची होती आणि त्या मंदिराचे ५६ खांब हिरे, माणके, पाचू, वगैरे रत्नांऐ जडवलेले होते.

मंदिराच्या गाभाऱ्यात रत्नदीपांचा लखलखाट अहोरात्र असायचा आणि कानोजी अत्तरांचे नंदादीप सतत तेवत असायचे
देवाच्या भांडार गृहात तर अमाप द्रव्याचा साठा होता.

 सोमनाथ लिंग कसे निर्माण झाले याविषयी कथा…

स्कंद पुराणातील प्रभासखंडात याबद्दल कथा दिली आहे.

फ़ार प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सत्तावीस मुली होत्या.

त्या सर्व मुलींचे चंद्राशी लग्न झाले.

Careview Anti Pollution Cotton N95 Reuseable Unisex Face Mask, Ear Loop Style (Pack of 10) Protective Fold Flat Mask with 6 Layered Filtration(With Head Mask Extender)

त्या सत्तावीस जणीत जी रोहीणी होती ती चंद्राला फ़ार आवडत असे.ती त्याची लाडकी होती.चंद्र फ़क्त रोहीणीवरच प्रेम करीत असे. यामुळे इतर बायका दुःखी झाल्या.चंद्र त्यांच्याशी बोलतसुध्दा नसे.

दक्ष राजाला हे समजले. तो दुःखी झाला.

तो चंद्राला म्हणाला ,”चंद्रा, तू थोर कुळात जन्मास आला आहेस. तेव्हा तू तुझ्या सर्व बायकांवर सारखेच प्रेम कर.”

दक्ष राजाने असे सांगितले खरे,पण चंद्राने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.तो आपला फ़क्त रोहीणीवरच प्रेम करु लागला.आपल्या उपदेशाचा काहीच उपयोग झाला नाही हे पाहून दक्षाला चंद्राचा राग आला.

त्याने चंद्राला शाप दिला, ” तू माझे ऎकले नाहीस म्हणून तुला क्षय होईल.”

दक्षाने शाप देताच चंद्राला क्षयरोग झाला.

त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. सगळे देव घाबरले.

आता यावर उपाय काय करायचा हे विचारण्यासाठी सर्वजण ब्रम्हदेवाला शरण गेले.

तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले,” समुद्रकाठी शंकराची आराधना करा. तेथे शिवलिंगाची स्थापना करा, म्हणजे शंकर प्रसन्न होईल व चंद्राचा रोग जाईल.”

सर्व देवांना खूप दिवस तप केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. चंद्राचा क्षयरोग गेला.त्याला त्याचे तेज मिळाले.

जेथे चंद्राने शिवलिंग स्थापन केले होते तेथे त्याने मंदिर बांधण्याचे ठरविले. ब्रम्हदेवाने त्याला मदत केली.

चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रम्हदेवाने जमीन उकरली. तेथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध व दर्भ यांनी झाकलेले होते. ब्रम्हदेवाने त्यावर एक शिला बसविली व त्यावर एक मोठे शिवलिंग बसविले.

चंद्राने त्याची पूजा केली. हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमाचा म्हणजे चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग.

सोमनाथ मंदिराचा इतिहास

इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे.

 इ.स. ७२२ मध्ये सिंधचा सुभेदार जुनायर याने आक्रमण करून येथील संपत्ती लुटली.

११ मे इ.स. १०२५ रोजी चुंबकाच्या चमत्कृतीपूर्ण कौशल्यामुळे अधांतरी असलेली श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून “मूर्तिभंजक “हा ‘किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली. 

इ.स. १२९७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने अलाफखानकरवी या देवस्थानाचा विध्वंस केला .

इ.स. १३९० मध्ये मुजफरशहा याने, इ.स. १४७९ मध्ये महंमद बेगडा याने, इ.स. १५०३ मध्ये दुसरा मुजफफरशहा याने आणि नंतर धर्मवेड्या औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये सर्वत्र नासधूस करून अनेकांची कत्तल केली आणि अलोट संपत्ती लुटून नेली.

१९ व्या शतकात झालेल्या भयानक भूकंपामुळेही मंदिराची अतोनात हानी झाली.

जरी धर्मद्रोह्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, तरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता नष्ट झाली नाही.

मुसलमान देशद्रोह्यांनी केलेल्या विध्वंसामुळे ज्योतिर्लिंगाचे अतोनात नुकसान झाले होते.

इ.स. १७८३ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी श्री सोमनाथाचे नवीन मंदिर बांधले.

 इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1783 मध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळ वेगळ्या मंदिराचा निर्माण केला.

या मंदिराचा गर्भाशय जमिनीच्या आत बनवला. जेणेकरुन महादेवाला विध्वंसक शक्तींपासून दूर ठेवलं जावं.

सध्या या मंदिराला जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखलं जातं.

मूळ मंदिराच्या जवळच सरदार पटेल यांनी नवीन मंदिर बांधलेले आहे.

सोमनाथ मंदिराला पुन्हा बनवण्याचा प्रस्ताव घेऊन सरदार पटेल महात्मा गांधींकडे गेले.

गांधीजींनी या प्रस्तावाचं कौतुक केलं आमि जनतेकडून यासाठी पैसे गोळा करण्याचा सल्ला दिला.

सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिर पुनर्निर्माणाचं काम हे एम मुंशी यांच्या देखरेखीत पूर्ण झालं. मुंशी हे त्यावेळी भारत सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते.

सोमनाथ-मंदिर-Somnath-temple
सोमनाथ-मंदिर-Somnath-temple

वर्तमानात सोमनाथ मंदिराची रचना गुजरातच्या चालुक्य वास्तूकला शैलीमध्ये 1951 मध्ये करण्यात आला.

चालुक्य वास्तूकला शैली उत्तर भारताच्या मंदिर निर्माण नगर शैलीचा एक प्रकार आहे.

प्राचीन ऐतिहासिक फलकांनुसार, सोमनाथमध्ये पहिले शिव मंदिराच्या स्थानाबाबत माहिती उपलब्ध नाही.

असे मानले जाते की श्रीकृष्ण भालका तीर्थ (सोमनाथ जवळ )येथे विसावले होते.

तेव्हाच शिकारीने नकळत हरणांचे डोळे म्हणून पद्मा चिन्ह ओळखून पायाच्या तळांवर बाण मारला. तेव्हा कृष्णाने त्याचे शरीर सोडले आणि येथून वैकुंठात गेले.

या ठिकाणी अतिशय सुंदर कृष्णा मंदिर बांधले गेले आहे.

Leave a Reply