श्रीपाद श्रीवल्लभ अष्टक : Shripad Shrivallabh Ashtak
श्रीपाद श्रीवल्लभ अष्टक : Shripad Shrivallabh Ashtak

श्रीपाद श्रीवल्लभ अष्टक : Shripad Shrivallabh Ashtak

श्रीपाद श्रीवल्लभ अष्टक

II श्री गणेशाय नमः II
|| श्री दत्तात्रेयाय नमः II 

वेदान्तवेद्दोवर योगीरूपं | जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यं |
इष्टार्थसिध्दि करूणाकरेशं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ||१ ||
योगीशरूपं परमात्मवेषं | सदानुरागं सहकार्यरूपं |
वरप्रसादं विबुधैकसेव्य | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये || २ ||
काषायवस्त्रं करदंडधारिणं | कमण्डलुं पद्मकरेण शंखम् |
चक्रंगदांभूषित भूषणाढ्यम् | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये || ३ ||
भूलोकसारं भूवनैकनाथ | नाथादिनाथं नरलोकनाथम् |
कृष्णावतारं करूणाकटाक्षं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये || ४ ||
लोकाभिरामं गुणभूषणाढ्यम् | तेजोमुनि श्रेष्ठमुनिर्वरेणयं |
समस्त दुःखानि भयानि शांतं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये || ५ ||
कृष्णासुतीरे वसतिप्रसिध्दं | श्रीपादश्रीवल्लभ योगिमूर्तिम् |
सर्वैर्जनैश्चिंतित कल्पवृक्षं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ||६ ||
मंत्राब्धिराजं युतिराजपुण्यं | त्रैलोक्यनाथं जनसेव्यनार्थं |
आनंदचितं अखिलात्मतेजं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ||७ ||
मंत्रानुगम्यं महानिर्वितेजं | महत्प्रकाशं महाशांतमूर्तिम् |
त्रैलोक्यचित्तं अखिलात्मतेजसं | श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ||८ ||

श्रीपादष्टकमिदं पुण्यं प्रातरुत्थाय यः पठेत् ||

कोटिजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति ||

॥ श्रीदत्तत्रेयार्पणमस्तु ॥      

श्रीपाद श्रीवल्लभांचे बोल

श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहिसा झाला पाहिजे.

ज्या वेळेस आपले ह्दय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही.

सृष्टी मधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते.

भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति-व्यक्ति मध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते.

पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते.

तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केले असते तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते.

परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही.

ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे.

भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे.

मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे.

दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.

सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो.

देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.

श्रीपाद श्रीवल्लभ पद

|| श्रीपाद श्रीवल्लभ जय नरसिंहसरस्वति यतिवर दत्ता ||ध्रु||
|| कृष्णावेणीतीरविहारा भवसंहारा शिक्षितमत्ता || 
|| सत्ता हे तव हे भवदवदव चित्तातीता हो अनियत्ता ||१||
|| सत्तारक तूं स्थिरचर हेतू हरिं मम मंतु निजपदीं चित्ता ||
|| रमवी रमणा भवभयहरणा निरूपमकरुणा मुनिजनवित्ता ||२||
|| वित्तातें श्रुतिमस्तकवित्ता आहे जरि तरि वळवुनि चित्ता ||
|| माझ्या आतां मजवरि दत्ता करीं करुणेक्षा मृदुतरचित्ता ||३||

हृदय रोगियों के लिए भारतीय आहार : Indian Diet For Heart Patients

Leave a Reply