सोमनाथ
गुजरात राज्यातील प्रभापटनम येथे हे मंदिर आहे. प्रभा पटनम हे ठिकाण गुजरात मधील वेरावळ जिल्ह्यामध्ये येते. बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आहे. प्राचीन ग्रंथानुसार सोम राजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण याठिकाणी केले. सोम राजा भगवान शंकराच्या आशीर्वादाने शापातून मुक्त झाला. म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी अख्यायिका आहे.