श्री गजानन महाराज बावन्नी : Shri Gajanan Maharaj Bavanni
श्री गजानन महाराज बावन्नी-Shri Gajanan Maharaj Bawanni

श्री गजानन महाराज बावन्नी : Shri Gajanan Maharaj Bavanni

|| श्री गजानन महाराज बावन्नी ||

|| श्री गजानन महाराज बावनी ||

जय जय सद्गुरु गजानन ।
रक्षक तूची भक्तजना ।।१।।

निर्गुण तू परमात्मा तू ।
सगुण रुपात गजानन तू ।।२।।

सदेह तू परि विदेह तू ।
देह असूनि देहातील तू ।।३।।

माघ वद्य सप्तमी दिनी ।
शेगांवात प्रगटोनी ।।४।।

उष्ट्या पञावळी निमित्त ।
विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।

बंकटलालावरी तुझी ।
कृपा जाहली ती साची ।।६।।

गोसाव्याच्या नवसासाठी ।
गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।

तव पदतीर्थे वाचविला ।
जानराव तो भक्तभला ।।८।।

जानकीराम चिंचवणे ।
नासवुनी स्वरुपी आणणे ।।९।।

मुकिन चंदुचे कानवले ।
खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।।

Amazon Brand – Solimo Plastic 500 ml Large Vegetable Chopper with 3 Blades, Blue

विहिरामाजी जलविहिना ।
केले देवा जलभरना ।।११।।

मद्य माश्यांचे डंख तुवा ।
सहन सुखे केले देवा ।।१२।।

त्यांचे काटे योगबले ।
काढुनि सहजी दाखविले ।।१३।।

 कुश्ती हरिशी खेळोनी ।
शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।।

वेद म्हणूनी दाखविला ।
चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।

जळत्या पर्यकावरती ।
ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा ।
अश्र्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा ।
समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।

रामदासरुपे त्याला ।
दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।

सुकलालाची गोमाता ।
व्दाड बहू होती ताता ।।२०।।

कृपा तुझी होतांच क्षणी ।
शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लश्मन शेगांवी ।
येता व्याधी तूं निरवी ।।२२।।

दांभिकता परि ती त्याची ।
तू न चालवूनी घे साची ।।२३।।

भास्कर पाटील तव भक्त ।
उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।।

आध्न्या तव शिरसा वंद्य ।
काकहि मानति तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रक्षीयला ।
देवां तू गणु जवर्याला ।।२६।।

 पितांबराकरवी लीला ।
 वठला आंबा पल्लविला ।।२७।।

सुबुध्दी देशी जोश्याला ।
माफ करी तो दंडाला ।।२८।।

सवडद येथील गंगाभारती ।
थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।।

 पुंडलिकाचे गंडातर ।
 निष्ठा जाणुनि केले दूर ।।३०।।

ओंकारेश्र्वरी फुटली नौका ।
तारी नर्मदा शणात एका ।।३१।।

माधवनाथा समवेत ।
केले भोजन अदृष्य ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना ।
प्रसाद तूंची पाठविला ।।३३।।

 कवर सुताची कांदा भाकर ।
 भक्शीलीस प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत ।
लिला  दाविली विपरीत ।।३५।।

बायजे चिती तव भक्ती ।
पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।।

 बापुना मनी विठ्ठल भक्ती |
 स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

 कवठ्याचा त्या वारकर्याला ।
 मरीपासूनी वाचविला ।।३८।।

 वासुदेव यति तुज भेटे ।
 प्रेमाची ती खुण पटे ।।३९।।

उध्दट झाला हवालदार ।
भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।

देहांताच्या नंतरही ।
कितीजना अनुभव येई ।।४१।।

पडत्या मजुरा झेलियले ।
बघती जन आश्चर्य भले ।।४२।।

आंगावरती खांब पडे ।
स्ञी वांचे आश्चर्य घडे ।।४३।।

गजाननाच्या अदभुत लीला ।
अनुभव येती आज मितीला ।।४४।।

शरण जाऊनी गजानना ।
दुःख तयाते करि कथना ।।४५।।

कृपा करी तो भक्तांसी |
धावुन येतो वेगासी।।४६।।

गजाननाची बावन्नी ।
नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।

बावन्न गुरुवारी नेमे ।
करा पाठ बहूं भक्तीने ।।४८।।

 विघ्ने सारी पडती दूर ।
सर्व सुखांचा येई पुर ।।४९।।

चिंता सार्या दूर करी ।
संकटातुनी पार करी ।।५०।।

सदाचार रत सदभक्ता ।
फळ लाभे बघता बघता ।।५१।।

भक्त गण बोले जय बोला ।
गजाननाची जय बोला ।।५२।।  

जय बोला  हो जय बोला । गजाननाची जय बोला।।

अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ।।              

।। गण गण गणात बोतेे ।।

|| श्री गजानन महाराज बावन्नी |||| श्री गजानन महाराज बावन्नी |||| श्री गजानन महाराज बावन्नी ||

श्री गजानन महाराज हे परमहंस संन्यासी होते.

त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती.

त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत.

तीव्र वैराग्यापोटी विव्दत्तापूर्ण परमहंस संन्यास घेतलेला संन्यासी हा सदैव ब्रह्यरुप अवस्थेत वावरत असतो. त्याच्या ठायी मायाजन्य अशी कोणतीही उपाधी नसते.

त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे.

Amazon Brand – Solimo Microfiber Reversible Comforter, Single (Aqua Blue & Olive Green, 200 GSM)

Leave a Reply