श्री क्षेत्र माहुरगड : Shri Kshetra Mahurgad
श्री क्षेत्र माहुर - Shri Kshetra Mahur

श्री क्षेत्र माहुरगड : Shri Kshetra Mahurgad

श्री क्षेत्र माहुरगड – Shri Kshetra Mahurgad

श्री गुरूदत्त महाराज यांचे श्री क्षेत्र माहुर हे निद्रास्थान आहे.

दत्त गुरूंच्या आरती मध्ये पण अंत्यत भक्ती रसात याचा उल्लेख आढळतो. आरती मधील हे द्वितीय कडवं आहे.

“गाणगापूरी वस्ती ज्याची । प्रिती औदुंबर छायेची ।

भीमा अमरजा संग्रामासी । भक्ती असे बहुत शिष्यांची ।

वाट दाऊनीया योगाची । ठेव दे निजपळ भक्तीची ।

काशी क्षेत्री स्नान करितो । करवीर भिक्षेला जातो ।

माहुर निद्रेला वरितो । तरतरीत छाती भर जरती ।

नेत्र गरगरित शोभतो त्रिशूळ जया हाती ।।२।।

ओवळीतो प्रेमे आरती ।।

तर याच माहुर गडाची दत्तकृपेने विस्तृत माहिती बघु या.

https://amzn.to/496654M

मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, किनवट तालुका येथील माहुरगडावर श्रीदत्तात्रेय, श्रीरेणुका, अनसूया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते.

श्री दत्त गुरुचे निद्रस्थान श्रीक्षेत्र माहूर

माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून येथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे.

स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात रेणुकामाहात्म्य आणि कालिकाखंडात आमली (माहूर)- माहात्म्य अशा दोन कथा आल्या आहेत.

श्री क्षेत्र माहुर

ब्रह्मदेवास सृष्टीची रचना करण्यास सोयीचे व्हावे म्हणून विष्णूंनी एक नमुना म्हणून सृष्टीच्या अगोदर हे क्षेत्र सात कोस लांब व सात कोस रुंद अशा विस्तृत प्रमाणावर निर्माण केले. या क्षेत्राला चार दरवाजे आहेत.

१) पूर्वेकडील हाटकेश्र्वर असून येथे बंजरा नदीवर धबधबा आहे.
२) दक्षिणेस पैनगंगेच्या काठी फुलसावंगी गावाजवळ एका टेकडीवर विमलेश्र्वराचे स्थान आहे.
३) पश्र्चिमेस इज़नी गावाजवळच्या पहाडात दर्दरेश्र्वर आहे.
४) उत्तरेकडे सिद्धेश्वर व कापेश्वर अशी स्थाने आहेत.

माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी ओलांडून गेल्यावर दोनचार मैलांवर पहाडाच्या पायथ्याशी माहुरक्षेत्र हे गाव आहे.

रेणुकामाता, दत्तात्रेय व अनसूया यांची शिखरे गावाच्या पार्श्र्वभूमीस लागून स्वतंत्रपणे आहेत. पैनगंगा नदीसही पौराणिक पार्श्र्वभूमी आहे.

विदर्भातील लोणारक्षेत्रात लवणासुरास विष्णूंनी मारले. म्हणून ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे पाय कमंडलूतील पाण्याने धुतले. भगवंताच्या चरणतीर्थातून पावन होणारी जी नदी ती पैनगंगा झाली. हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणहिता असे नाव मिळाले.

श्री रेणुका माता

‘प्रणिता प्रदक्षिणा वाहते । दुजें वैकुंठ महीवतरें’ असा महिमा या क्षेत्राचा विष्णुदासांनी वर्णन केला आहे. आमलीग्राम, सिद्धपूर, देवनगर, मातापूर अशी विविध नावे निरनिराळ्या युगात या क्षेत्रास मिळालेली दिसतात.

काशीक्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने ‘जवा आगळी काशी’ असे माहूरसंबंधाने म्हटले जाते. काशी क्षेत्रास जसा काळभैरव तसा या क्षेत्रास झंपटनाथ हा क्षेत्रपाल कोतवाल आहे.

या माहूर क्षेत्रात जगदंबा रेणुका, दत्तात्रेय व देवदेवेश्र्वर या प्रमुख दैवतांचा वास असल्याने सर्वच भाविकांना याची ओढ नित्य असते. जमदग्नी, रेणुका, परशुराम यांची स्थाने येथेच आहेत. जमदग्नीच्या चितेवर रेणुका सती गेली ती येथेच.

दत्तात्रेय या प्रसंगी उपस्थित होते. चितेतून गळ्यापर्यंतच निघालेली रेणुका आज येथील रम्य शिखरावर निवास करून आहे. शिखराच्या पायथ्याशी मोवाळा नावाचा एक तलाव असून त्याला मातृतीर्थ म्हणतात.

या तीर्थात स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. रेणुकाशिखरापासून तीन मैलांवर दत्तात्रेयांचे शिखर आहे. हे संस्थान गोसावी महंतांच्या ताब्यात होते. तूर्त तेथील व्यवस्था सरकार पाहते.

येथील मंदिरात दत्ताच्या पादुका व महादेवाची पिंड आहे. दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्वतीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात.

दत्तशिखराच्या दक्षिणेस मैल-दीड मैलावर अनसूयेचे शिखर असून तेथे अत्री ऋषींचा आश्रम होता. दत्तात्रेय व अनसूया यांच्या मूर्ती या शिखरावर आहेत. दत्तात्रेयांच्या चरित्रातील अनेक सुरस कथा याच भागात घडल्याचे सांगतात.

श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ : Shri Swami Samarth Mantra Jap Labh

दत्तशिखर व अनसूयाशिखर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो.

दत्तशिखरावरही अनसूया, विठ्ठलरखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दत्तमंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी दोन मंदिरे आहेत.

धुनीतील दत्ताचे भस्म प्रासादिक मानले जाते. दरवाज्यासमोर पश्र्चिमेस उजव्या सोंडेचा गणपती आहे.

जवळच कामाक्षीचे लहानसे मंदिर आहे. आसपास गोसावी महंतांच्या अनेक समाध्या आहेत.

अनसूया पहाडावर अनसूया व दत्तात्रेय यांच्या मूर्तीखेरीज अत्रिऋषींच्या पादुका आहेत.

माहुर गावालगतच पायथ्याशी महानुभवांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्र्वर हे दत्तस्थान आहे.

रेणुका व दत्तात्रेय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रावर गेले आणि त्यांनी विष्णूला माहूरात आणले.

विष्णूंनी येताना आवळीचे झाड बरोबर आणले. विष्णू दत्तात्रेयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकेच्या सांगण्यावरून विष्णूच्या पोटात शिरून शंकराची प्रार्थना केली.

परशुराम दत्तात्रेयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तीन देवांच्या रूपाने राहू लागला.

हाच देवदेवेश्र्वर म्हणून प्रसिद्धीस आला. दत्तात्रेयांचेही मन येथे रमले व ते आवळीच्या झाडाखाली ध्यानधारणा करू लागले. पिंगलनाग नावाचे ऋषीही या ठिकाणी दत्तात्रेयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले.

देवदेवेश्र्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात. रोज सायंकाळची आरती येथे पाहण्यासारखी असते.

दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्चबाधा दूर होते.

देवदेवेश्र्वराच्या खालच्या बाजूस पद्मतीर्थ आहे. शंखतीर्थ, बद्रितीर्थ अशी काही स्थाने येथून जवळच आहेत.

माहूरगडावरील किल्ल्यात एक ब्रह्मतीर्थ असून त्यास विंझाळे म्हणतात.

याच गडावर महाकालिकेचीही मूर्ती आहे.

जम नावाच्या एका रजपूत राजाने हा किल्ला सहाव्या शतकात बांधला असल्याचे सांगतात. याचे स्मारक म्हणून ‘जमठाकरी’ नावाच्या एक सण नागपंचमीसारखा आषाढ शु. पंचमीस साजरा करतात.

किल्ल्यात गौतम झरा आहे. माहुरच्या वायव्य दिशेस पहाडात कोरलेले पांडवलेणे आहे.

तेथील तीर्थास पांडवतीर्थ म्हणतात. रेणुकाशिखरापासून चार मैलांवर कैलासटेकडी आहे.

येथे एक शिवलिंग आहे. रेणुकेपासून अर्ध्या मैलावर औदुंबर झरा आहे. अत्रिकुंड, चरणतीर्थ, आत्मबोधतीर्थ, कमंडलुतीर्थ, कज्जलतीर्थ, मूलझरी, रामतीर्थ अशी आणखीही काही पवित्र स्थाने माहुरगडावर आहेत.

जमदग्नीच्या खोरीत सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ, पापमोचन केदा, मुद्गलेश्र्वर, ऋणमोचन, काशी, प्रयाग, कपिला, भान, परशू, गदा, रामगया इत्यादी नावांची क्षेत्रे आहेत.

याच माहुरगडावर दासोपंत, साधुमहाराज, विष्णुदास इत्यादींना दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला.

मातृतीर्थाजवळच श्रीविष्णूदासांचा मठ आहे. विष्णूदासांचे बंधू श्रीगुरुदासमहाराज यांचीही समाधी येथेच आहे.

दत्तप्रभू, अत्री, अनसूया यांची भक्तिपर स्तवने विष्णूदासांनी अतिशय लडिवाळ व वात्सल्यपूर्ण भाषेत केली आहेत.

रेणुका व दत्तात्रेय यांची वाङ्मयीन पूजा श्रीविष्णूदासांनी केलेली आपण पाहिली आहेच. दत्त, रेणुका, अनसूया, देवदेवेश्र्वर, परशुराम, अत्री इत्यादींच्या वास्तव्यामुळे अनेक भाविकांचे चित्त माहुरगडाशी निगडित झालेले दिसते.

येथील पहाडावरील दाट झाडी व एकांत यांचा शोध अनेकांना झाला असल्यास नवल नाही.

अलीकडे धनोडे येथे पैनगंगेवर मोठा पूल झाल्याकारणाने रेणुकामाता व दत्तप्रभू यांच्या दर्शनार्थ येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

चैत्री पौर्णिमा, नवरात्र, दत्तजयंती अशा प्रसंगी येथे मोठीच यात्रा भरत असते.

दत्तात्रय अनुसया मंदिर माहुर

मातापूर’ अर्थात माहूर या नावाने श्रीदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांपकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र ‘प्राचीन दत्तक्षेत्र’ म्हणूनही तितकंच प्रसिद्ध आहे.

अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या ‘दत्तशिखरा’वर श्रीदत्तात्रेयांचा वास आहे.

माहूर गावापासून चार-पाच कि. मी. अंतरावर असलेल्या दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली.

https://amzn.to/496654M

येथे आपणांस एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते.

येथे ‘भारती’ परंपरेतील गोसाव्यांचा नित्य वावर आहे. दत्तस्थानापासून मलभर अंतरावर सती अनुसयेचे मंदिर आहे. येथून जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे.

येथील दत्तमंदिराच्या प्रशस्त आवारात दत्तपादुका, शिविलग आदी स्थापित आहेत.

श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयाचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयागवनात आहे. तो स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्याची विहारस्थाने आहेत.

यांतील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते.

तो पांचाळेश्वरी स्नान करतो आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतो, अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी मात्र तो मातापूर ‘माहूर’ येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतो.

दत्तमहाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे.

दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी

माहूरला आधी मुनी अत्री आणि महासती अनसूया तिसर्या डोंगरावर राहत असत जे आजही आहे.

तिथे श्री दत्तात्रेय, श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला. चंद्र हे ब्रम्हा रूप, दुर्वास हे शिव रूप आणि दत्त हे विष्णू रूप मानले गेले.

दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी

दुर्वास मुनी चा छोटा आश्रम आजही आहे.

दत्त शिखर अलीकडचे आणि सर्वात उंच, आणि त्याआधी माता रेणुका शिखर.

परशुरामांना मातृशोक झाल्यानंतर सहस्रार्जुनावरचा क्रोध आवरेना, तेंव्हा काही मुनींनी त्यांना माहूरला जाऊन दत्त मुनींना भेटा असे सांगितले.

ते पार्थिव घेऊन तिथे गेले आणि दत्त मुनींनी त्यांचे सांत्वन केले.

जिथे गडाखाली तीर्थ आहे तिथे संस्कार केले. म्हणून आजही मातृ संस्कार करण्यासाठी बरेच जण तिथे जातात.

जवळचे शिखर हे आईच्या नांवे होईल म्हणून सांगितले.

माहूर जवळ (हिवरा संगम जि. यवतमाळ येथे) पूस आणि पेनगंगा संगम होऊन नदी उत्तरवाहिनी होते, म्हणून ते पवित्र ठिकाण.

तर असा आहे माहूर येथील दत्त नामाचा महिमा !

।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏

https://amzn.to/3HVt737

Leave a Reply