श्री दत्तभिक्षालिंग मंदिर:Shri Datta Bhikshalinga Temple
श्री दत्तभिक्षालिंग मंदिर:Shri DattaBhikshalinga Temple

श्री दत्तभिक्षालिंग मंदिर:Shri Datta Bhikshalinga Temple

श्री दत्तभिक्षालिंग मंदिर

श्री महालक्ष्मी दररोज येथे श्री गुरुमाऊलींना भिक्षा अर्पण करते.

हे नाथ संप्रदायाचे केंद्र सुद्धा आहे.

कोल्हापूर शहरातील रविवार पेठेत श्री दत्तभिक्षालिंग मंदिर हे जागृत दत्त स्थान आहे.

माध्यान्हकाळी श्री दत्तप्रभू इथेच जगदंबेकडुन भिक्षा ग्रहण करतात.

महालक्ष्मी आणि दत्तप्रभू

त्या स्थानी नवनाथांपैकी एक वटसिद्ध नवनाथांनी श्री दत्तप्रभूंना भिक्षादान केले होते.

तसेच श्री गोरक्षनाथांनी दत्त महाराजांची भिक्षाक्षेत्राची झोली येथील श्रीदत्त भिक्षालिंग स्थानापासून सुरु केली होती.

या स्थानाबाबतची वटसिद्धनागनाथांची कथा नवनाथकथासार अध्याय क्रं.३६ आणि ३७ मध्ये आलेली आहे.

श्रीदत्त प्रभू दक्षिण काशीक्षेत्र म्हणजेच कोल्हापूर येथेच माध्यान्न काळी भिक्षा ग्रहण करतात.

या स्थानी श्री गोरक्षनाथांनी श्री समर्थ रामदास स्वामींना कुबडी प्रदान केली होती. ती आजची सज्जन गडावर पहावयास मिळते.

श्री महालक्ष्मी मातेच्या आदेशावरुन श्री नारायण स्वामींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली.

त्यांना स्वयं श्री दत्तप्रभुंनी याच स्थानी दर्शन दिले. त्यांची समाधी प्रमुख दत्त क्षेत्र श्रीनृहसिंह वाडी येथे आहे.

या स्थानी दुपारच्या बाराच्या आरतीच्या वेळी श्रीदत्तप्रभूंचे अस्तित्व जाणवते.

ज्या प्रमाणे गाणगापूर येथे सदगुरु दत्तात्रेयांचे द्वितीय मनुष्यरुपी अवतार असलेले श्री नृहसिंह सरस्वती स्वामी दुपारच्या वेळी माधुकरी मागतात.

त्याचप्रमाणे येथे स्वयं दत्तप्रभू भिक्षा मागण्यास येतात.

|| हरि ॐ. श्री. गुरुदेव दत्त ||

।। श्रीगुरू दत्तात्रेयार्पणमस्तु ।।

boAt Rockerz 450 Bluetooth Wireless On Ear Headphone with Mic (Aqua Blue)

Leave a Reply