सिद्ध मंगल स्तोत्र : Siddha Mangal Stotra
सिद्ध मंगल स्तोत्र : Siddha Mangal Stotra

सिद्ध मंगल स्तोत्र : Siddha Mangal Stotra

सिद्ध मंगल स्तोत्र

सिद्ध मंगल स्तोत्रम गीते श्रीपाद श्रीवल्लभांच्या दैवी क्रिया, गुण आणि उत्पत्तीचे वर्णन करतात.

या स्तोत्राची एक रंजक कथा अशी आहे की श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलु यांनी या स्तोत्राचा जप आनंदात केला होता जेव्हा त्यांना कळाले कि, भगवान दत्तांचा त्यांच्या घरी नातू म्हणून जन्म होणार आहे.

या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात सिद्ध मंगल स्तोत्र येते.

१)    श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

२)    श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

३)    माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

४)    सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

५)    सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

६)    दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

७)    पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

८)    सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

९)    पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे हे सिद्ध मंगल  स्तोत्र आवडते स्तोत्र आहे.

सिद्ध मंगल स्तोत्राच्या ओळींचा अर्थ समजून त्याचे पठण केल्याने खूप फायदे आहेत आणि भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

ग्रंथकार शंकर भट म्हणतात,” श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी “सिद्धमंगल” स्तोत्र लिहिले.

प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत.

परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते.

याच्या पठणाने मनातील सर्व कामना पुर्ण होतात.

जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात.

।।  श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

 ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।

Dabur Organic Honey | 100% Pure and Natural | NPOP Organic Certified | Raw , Unprocessed , Unpasteurized Honey | No Sugar Adulteration – 300gm

Leave a Reply