श्री स्वामी समर्थ तारक मंत्र : Shri Swami Samarth Tarak Mantra
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र : Shri Swami Samarth Tarak Mantra

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र : Shri Swami Samarth Tarak Mantra

Swami Samarth Tarak Mantra – स्वामी समर्थ तारक मंत्र

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shri Swami Samarth Tarak Mantra

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

अशक्य ही शक्य करतील स्वामी…
अशक्य ही शक्य करतील स्वामी…

‘तारक मंत्र’ ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. 

https://amzn.to/3UhJEp5

जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. 

स्वामींनी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. 

तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्यचा विचारही करू शकत नाही.

 शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते.

आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. 

या मंत्रात एक कडवे आहे कि “अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी”, फक्त आणि फक्त ह्या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या.

ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत, आणि राहणारच.

सर्व जणानी हा तारक मंत्र म्हणायला सुरवात करावी. 

कुटल्या ना कुटल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सद्देव माझ्या बरोबर आहेत. 

https://amzn.to/3Uhtvju

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली: Shree Swami Samarth 108 namavali

Leave a Reply

This Post Has 6 Comments

 1. Nanarao Badal

  Shri Swami Samarth…🙏🙏🌼

 2. Rupali Bankar

  Shri Swami Samarth…🙏🌺🙏🌺

 3. अमित ठोंबरे

  श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ….
  श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

 4. नानाराव भोमरे

  कोणाला स्वामी समर्थ महाराज यांच्या तारक मंत्र ची प्रचिती आली आहे का?

 5. Pratibha Bhosale

  Jai Jai Swami Samarth… 🌺🌸💮🌺🌸💮

 6. राजाराम कोलते

  Jai jai shri Swami Samarth….