श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट : Shri Swami Samarth, Akkalkot
श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट - Shri Swami Samarth, Akkalkot

श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट : Shri Swami Samarth, Akkalkot

श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो.

दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे.

गुरु परंपरा

श्री गुरुदत्त
       |
श्रीपाद श्रीवल्लभ
       |
श्रीनृसिंह सरस्वती
       | 
श्रीस्वामी समर्थ

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.)

तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली.

बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते.

आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.

“आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन,” असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे.

शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली.

श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. 

तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले.

विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले.

त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले.

सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले.

त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते.

त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले.

ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली.

निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले.

त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती.

तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला.

त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते.

त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता.

प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली.

श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.

यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत.

या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत.

तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन : Shri Swami Samarth Prakat Din

परम अर्थाचे स्वामी बोल

भगवंताचे सहा सद्गुण असतात. ऎश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सद्गुण होत. यांनाच ‘भग’ म्हणतात.

हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. स्वामी महाराज हे साक्षात भागवंतच.

पण हे सद्गुण म्हणजे तरी काय ? 

१) सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य 
२) नीती, न्याय आणिकृपा हा धर्म  
३) सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश 
४) निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव 
५) निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान 
६) हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य

या सहा गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधीष्ठान देणारा भगवंत असतो.
पूर्व जन्म।तील कर्मे हे ‘संचीत’ असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे  ‘प्रारब्ध’.

प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुशकृत्याने दुःख अनुभवास येते.

देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत.

प्रारब्ध टाळून टाळता येत नाही. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच.

म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे.

प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव गुरु करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते.

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

DOCAT Window Cleaning Brush 2 in 1 Glass Cleaner Wiper for Bathroom Cleaning Supplies Bathroom Cleaning Brush Wet and Dry Cleaning Tools for Bathroom Cleaning (Blue)

Leave a Reply