नृसिंह सरस्वती आरती : Nrusinh Saraswati Aarti
नृसिंह सरस्वती आरती : Nrusinh Saraswati Aarti

नृसिंह सरस्वती आरती : Nrusinh Saraswati Aarti

श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे.

श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे.

प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. 

नृसिंह सरस्वती आरती

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।
चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।
मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।
अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।
म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।
आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।
निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।
भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।
गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥

Leave a Reply