श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ
निर्गुण-पादुका-गाणगापूर

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली.

तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा !

याबाबत सविस्तर माहिति “श्री गुरु चरित्र” ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.

श्री क्षेत्र गाणगापूर “श्रीनृसिंह सरस्वतींनी” आपल्या “२८” वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्य करिता निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.

” भिमा अमरजा” नद्यांच्या संगमाच्या आसपास दोन मैलांचा परिसर विविध कारणाने पवित्र झाला आहे.

पौराणिक काळातील विभूतींनी तपस्या करून यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे.

या क्षेत्राचे महात्मा समजून घेण्यास येथील काही स्थळांचा परिचय करून घेणेही आवश्यक आहे.

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ 

 • “षट्कुळ व नृसिंह तिर्थ” (१-२) ह्या तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होते. ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळते .
  1. षटकूल तीर्थ :- हे तीर्थ प्रयाग तीर्थ समान आहे.  जालंधर नावाचा एक राक्षस जेंव्हा  फार  माजला  तेव्हा त्यांच्या नाशासाठी   प्रयत्नात देवांना मरण आले.  त्यांना  जिवंत करण्यास अमृत पाठवले त्यातील काही भाग खाली पडला त्यातून अमरच्या नदीचा प्रवाह निर्माण झाला .         
  2. नरसिंह तीर्थ :- या तीर्थात प्रथम स्नान करावे नंतर संगमेश्वराची पूजा करावी असे केल्यास श्रीशैल्य मलिका अर्जुनाची सेवा केल्याचे पुण्य मिळते.             
 • “भागिरथी” (३) तीर्थात् स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते. हे तीर्थ मणिकर्णीका सामान आहे. भारद्वाज गोत्रातील एका ब्राह्मणाच्या प्रार्थने नुसार श्री शंकराने येथे गुप्त वास्तव्य झाले तेथे एक लिंग उद्भवले शिवोपासक भक्त येथे काशी यात्रेचे विधी करतात.   
 • “पाप विनाशी” (४) ‘तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे’, म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं महराजांचे भगिनि “रत्नाई” चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.
 • “कोटि तीर्थ” (५) ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळते.
 • “रुद्र पाद” (६) हे तीर्थ “गया” समान आहे. गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होते.
 • “चक्र तीर्थ” (७) हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावतिचे चौपट् पुण्य मिळते व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होते. येथे अस्थी विसर्जन करतात येथे विसर्जित केलेल्या अस्थी चक्राकार होतात.        
 • “मन्मथ तीर्थ” (८) येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होते. या तीर्थाजवळ कल्लेश्वर चे देऊळ आहे . हे तीर्थ गोकर्ण क्षेत्रातील महात्मा दाखवणारे आहे. या तीर्थात  स्नान करून  कल्लेश्वर पूजा केल्यास महाबळेश्वराची सेवा केल्याचे फळ मिळते. 
boAt Airdopes 121v2 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with Mic (Active Black)

भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात.

एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली.

ह्या तीर्थात स्नान केल्याने काळमृत्यू, अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते, दारिद्र्यनाश होतो, सर्व पापे नाहीशी होतात. आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते.

काशी क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते. प्रयाग येथील त्रिवेणी संगम् नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते. जन्मांचे दोष नाहीसे होतात. ज्ञान प्राप्ती होते, वंशवृद्धी होते.

श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते.

याच तीर्थांवर श्री नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.

 ।। भीमातटि असे गाणगा भुवन । पुण्यभूमि असे या त्रिभुवन ।।

श्रीगुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते. श्रीनरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरुआज्ञेने शुष्ककाष्ठाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे श्रीगुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली.

इथला श्रीनृसिंह सरस्वतींचा ‘विश्रांतीचा कट्टा’ ही सुप्रसिद्ध आहे. श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत.

श्रीमहाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे.

  ॥श्री गुरुदेव दत्त ॥

Leave a Reply