श्री क्षेत्र पीठापूर : Shri Kshetra Pithapur
श्री क्षेत्र पीठापूर-Shri Kshetra Pithapur

श्री क्षेत्र पीठापूर : Shri Kshetra Pithapur

श्री क्षेत्र पीठापूर-श्रीपादांचे जन्मस्थान  : Pithapur Datta Mandir

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.

कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे.

आंध्र प्रदेशात, काकीनाडापासून 20 किमी आणि राजमुंद्रीपासून 75 किमी अंतरावर स्थित, हे भारतातील 18 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.

हे तीर्थक्षेत्र आणि खूप महत्त्वाचे मंदिर म्हणून ओळखले जाते कारण त्यात अनेक महत्त्वाच्या देवतांची अर्थात श्री पुरहूतिका देवी, श्री कुक्कुटेश्वर स्वामी, श्री दत्तात्रेय स्वामी(श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त क्षेत्रम्) यांची मंदिरे आहेत.

पूर्वी पिठिकापुरम म्हणून ओळखले जाणारे पीठापुरम हे अष्टदशा (अठरा) शक्तिपीठांपैकी एक आहे.

कारण याच ठिकाणी सतीदेवीच्या शरीराचा एक भाग म्हणजेच तिचा डावा हात येथे पडला होता.

तिला येथे पुरूहूतिका देवी म्हणून ओळखले जाते. तिचे मंदिर श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या समोर आहे.

श्री कुक्कुटेश्‍वर स्वामी, भगवान शिवाचे एक रूप, हे प्रमुख देवता आहेत जे स्वतःला लिंगाच्या रूपात प्रकट करतात.

हे पांढऱ्या संगमरवराचे स्वयंभू लिंग (स्वतःचे उगमस्थान) असून त्याची उंची सुमारे दोन फूट आहे.

हे लिंग कोंबड्यासारखे दिसते. म्हणून भगवान शिवांना श्री कुक्कुटेश्वर स्वामी म्हणतात.

श्री कुकुटेश्वर मंदिर, पीठापूर 

हे स्थान त्रिगया क्षेत्रांपैकी एक आहे आणि ते पाद गया क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

लोकांच्या भल्यासाठी एक महान यज्ञ करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार आपला देह घातला असणा-या गया असुर, एक शक्तिशाली परंतु पवित्र राक्षस यांच्यामुळे हे पाद गया क्षेत्रम् म्हणून ओळखले जाऊ लागले.

तो इतका प्रचंड होता की त्याचे डोके बिहारमध्ये विसावले आणि पाय पीठापुरमला पोहोचले.

ज्या ठिकाणी त्यांचे पाय विसावले ते एक तलाव होते त्यानंतर हे तलाव पाद गया सरोवर (पवित्र तलाव) म्हणून ओळखले जाऊ लागले.

असे मानले जाते की जो कोणी या पवित्र तलावामध्ये स्नान करतो त्याच्या पापांपासून मुक्त होते आणि येथे केलेल्या “पिंड प्रदानम” त्यांच्या प्रियजनांचे तारण सुनिश्चित करते.

श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान

सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला.

आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता.

त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले.

ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते.

त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे.

त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की,” प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत.

कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा.”

हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले “तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील.”

हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले.

तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला.

तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.

या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले.

तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले.

मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले.

सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे.

१६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले.

पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली.

माता – पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे.

तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले.

पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले.

व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल.

वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल.

आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर सोडले.

श्री दत्त पादुका, पीठापूर 

हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात.

तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली .

सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली.

तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

या मुर्तचीी स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली.

तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे.

त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत.

तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे.

हे मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते.

दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते.

संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. 

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत.

श्री क्षेत्र पीठापूर

श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान.

 तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की,

श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत.

श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही.

हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.

पीठापूर स्थानाची वैशिष्ट्ये

१.    श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला.
२.    कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत.
३.    श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याचठिकाणी घडल्या.
४.    श्रीपादश्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत.
५.    त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली.
६.    श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनच भक्त पिठापूरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान.
७.    चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील.
८.    येथे आलेल्या सर्वांची बाधा पिडा निरसन होऊन ते सुखी होतात.
९.    रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापूरी वास्तव्य करुन श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील. त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील.

॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

Voltas Mini Magic Pure-T 500-Watt Water Dispenser (White)

Leave a Reply