रामायण आणि रामचरितमानस यांच्यातील फरक:Difference between Ramayana And Ramcharitmanas
ramayan and ramcharitmanas

रामायण आणि रामचरितमानस यांच्यातील फरक:Difference between Ramayana And Ramcharitmanas

रामायण आणि रामचरितमानस यांच्यातील फरक

रामायण

रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून हिंदू धर्मातलाएक पवित्र ग्रंथ आहे. रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत.

1.बाल कांड – रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस. विश्वामित्रांनी त्यांना राक्षसांच्या संहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदी घटनांचा समावेश.

2.अयोध्या कांड – या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो.

3.अरण्य कांड – वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.

4.किष्किंधा कांड – सीतेच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतात. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतेस शोधण्यास प्रारंभ करतात.

5.सुंदर कांड – या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान समुद्र लांधून लंकेत प्रवेश करतात. लंकादहन घडवितात. रावणाच्या राज्यातील अशोकव न येथील सीतेच्या उपस्थितीबद्दल रामास कळवितात.

6.युद्ध कांड – या भागात राम – रावण यांचे युद्ध, रावण वध, त्यानंतर रामाचे सहपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

7.उत्तर कांड – रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.

रामचरितमानस 

रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे. त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे. हा ग्रंथ तुलसीदासांनी 26 दिवसात लिहून पुर्ण केला असे मानतात.

रामचरितमानस हे चरित्रकाव्य आहे. या ग्रंथातही सात कांडे आहेत.

1.बालकाण्ड

2.अयोध्याकाण्ड

3.अरण्यकाण्ड

4.किष्किन्धाकाण्ड

5.सुन्दरकाण्ड

6.लंकाकाण्ड

7. उत्तरकाण्ड

रामकथेला सुरूवात करण्यापूर्वी रावणाच्या काही पूर्वजन्मांच्या व रामाच्या पूर्वावतारांच्या कथा सांगितल्या आहेत.  कथा निरुपण करण्यावर यात जास्त भर आहे. 

रामलीला या उत्सवाचा प्रारंभ रामचरितमानासामुळेच झाला असे मानले जाते.

रामाच्या राज्याभिषेकानंतर गोसावी तुलसीदास जी यांनी रामचरितमानस समाप्त केले आहेत, तर आदिकवी श्री वाल्मीकि यांनी श्री रामाच्या महाप्रयाण पर्यंत आपल्या रामायणातील कथा सांगितली आहे.

महर्षि वाल्मीकि यांनी संस्कृत भाषेत रामायण लिहिले तर तुलसीदासजींनी अवधी आणि संस्कृत भाषेत रामचरितमानस लिहिले.

श्री रामांचे जीवन महर्षी वाल्मिकी यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांच्या कथेचा आधार स्वतः रामाचे जीवन होते,

तर तुलसीदासजींनी रामचरितमानस रामायणासह इतर अनेक रामायणांच्या आधारे लिहिले. हनुमानजींनी त्यांना मदत केली असेही म्हणतात.

रामायण संस्कृत कवितेच्या भाषेत लिहिले गेले होते ज्यात सर्ग आणि श्लोक चा समावेश आहे,

तर रामचरितमानसात दोहो आणि चौपाई ची संख्या जास्त आहे.

सध्या वाल्मिकीचे रामायण वाचणे आणि समजणे अवघड आहे कारण त्यांची भाषा संस्कृत आहे.

तर रामचरितमानस सध्याच्या बोलक्या भाषेत लिहिलेले आहेत. जनमानसांच्या या भाषेमुळे रामचरित मानस पठण सर्वत्र प्रचलित आहे.

Leave a Reply