पंचमुखी हनुमान कथा:Story of Panchmukhi Hanuman
Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमान

पंचमुखी हनुमान कथा:Story of Panchmukhi Hanuman

पंचमुखी हनुमान कथा

पंचमुख हनुमान हा महारुद्र हनुमान यांचा अंशकालीन अवतार आहे.

देवी सीताआईला आणण्यासाठी राम आणि रावणाच्या सैन्यात जोरदार युद्ध चालू होते. रावणाचा पराभव जवळ होता.

मग या समस्येवर मात करण्यासाठी त्याला मायावी अहिरावण आठवला जो माँ भवानीचा उत्तम भक्त तसेच त्याला तंत्रमंत्राचा उत्तम ज्ञान होते .

आपल्या माये च्या साहाय्याने युद्धा मधल्या सर्व सैन्याला झोपवून टाकले.

आणि श्री राम आणि लक्ष्मण यांचे अपहरण केले आणि त्यांना पाताळ लोकात बलि देण्यासाठी आणले.

काही वेळा नंतर, जेव्हा मायेचा प्रभाव कमी झाला, तेव्हा विभीषणने हे अहिरावनचे कार्य असल्याचे ओळखले आणि हनुमानजींना श्री राम आणि लक्ष्मण यांना मदत करण्यासाठी पातळ लोक ला जाण्यास सांगितले.

पातळ लोकाच्या प्रवेशद्वारावर त्यांना त्याचा मुलगा मकरध्वज भेटला जो अर्धा मर्कट आणि अर्धा मकर प्रमाणे होता आणि युद्धामध्ये त्यांचा पराभव करून, त्यांना बंधक श्री राम आणि लक्ष्मण भेटले.

यानंतर हनुमान ने श्री राम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले.

हनुमान ने श्री राम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले.

आणि मग रावण बंधू आहि रावण सोबत युद्ध झाले त्यात तो मारता मरेना.

मग तिथे नागकन्या चंद्रलेखा आली आणि तिने आहि रावण चे मृत्यू रहस्य सांगितले.

“आई भवानी साठी आहि रावण ने पाच दिशेला पण दिवे लावले आहेत ते एका दमात फुकायचे.”

तेव्हा हनुमान यांनी महारुद्र पंचमुखी हनुमान स्वरूप धारण केले.

उत्तरेस वराह मुख, दक्षिणेस नरसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, हयाग्रीव मुख आकाशाकडे आणि पूर्वेस हनुमान मुख.

पंचमुखी हनुमान यांचे गुणधर्म असे

  1. हनुमान भगवान: तो पूर्वेकडे स्थिर भक्तीने तोंड आहे . हनुमानाची उपासना केल्याने एखाद्याच्या पापांपासून मुक्त होण्यास मदत होते आणि शांती, शुद्धता, आनंद आणि पूर्ती मिळते.
  2. भगवान नरसिंह: भगवान विष्णूच्या अनेक अवतारांपैकी एक, हा सिंह रूप दक्षिण दिशेला आहे. भगवान विष्णूने हा प्रह्लादाच्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी हा प्रकार धरला. नरसिंहाची उपासना केल्यास भीती दूर होते. निर्भयता आणि विजय हे भक्ताला दिलेला आशीर्वाद आहे.
  3. गरुड भगवान : पश्चिमेस, गरुड किंवा गरुड हा पंचमुखी हनुमान प्रकट आहे. तो नकारात्मक प्रभाव, काळा जादू आणि वाईट विचारांपासून संरक्षण देतो.
  4. भगवान वराह : वराह हे आणखी एक प्रकटीकरण आहे आणि असे मानले जाते की ग्रहांच्या हालचालींवरील दुष्परिणाम दूर करतात. उत्तरेकडे तोंड करून, वराह संपत्ती आणि समृद्धी देते.
  5. भगवान हयाग्रीव: घोड्याचे रूप वरच्या म्हणजे आकाशाच्या दिशेने होते, एखाद्याला ज्ञान, संतती आणि मुक्तीचे आशीर्वाद देते.

पाच वेगवेगळ्या शक्ती एकत्र करून एकाच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या अहि रावणाचा विनाश केला म्हणून आणि दक्षिण हि पातळ दिशा म्हणून दक्षिणे कडे तोड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावतात.

हा फोटो देव्हाऱ्यात ठेवावा कि बाहेर ठेवावा याबद्दल वेगळे वेगळे विचार आहेत कारण हे उग्र रुद्र दैवत आहे.

Tosaa Aluminium 12 Cavity Appam Patra Paniyarakkal Two Side Handle with Steel lid & Wooden Picker, ( 23 cm, Black)

Leave a Reply