खंडेरायाची जेजुरी : Khandoba Mandir, Jejuri
खंडेरायाची जेजुरी - Khandoba Mandir, Jejuri

खंडेरायाची जेजुरी : Khandoba Mandir, Jejuri

खंडेरायाची जेजुरी- Khandoba Mandir, Jejuri

महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव.

जेजुरी पुण्यापासून सुमारे ४८ किलोमीटर आणि सोलापूरपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. 

या मंदिराचे दोन भाग असून पहिला भाग हा मंडपाचा आहे. दुसरा भाग हा गर्भगृह असून तेथे खंडोबाचे स्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथीय आहे. या मंदिरात 28 फूट आकाराचे पितळाचे कासव आहे.

याशिवाय ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाची अनेक शस्त्रेही मंदिरात ठेवण्यात आली आहेत.

चढण्यासाठी 400 पायर्‍या आहेत आणि त्यापैकी बहुतेक उंच उंचीच्या आहेत.

परंतु जर तुम्ही थोडा पुढे प्रवास केला तर एक नवीन मार्ग आहे ज्यामध्ये 200 पायऱ्या आहेत आणि ते अगदी सोपे आहे.

दसऱ्याच्या दिवशी दातांच्या साहाय्याने जास्त वेळ जड तलवार धरण्याची स्पर्धाही असते, जी खूप प्रसिद्ध आहे.

दक्षिणे मध्ये मणि मल्ल राक्षसांचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळा पासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.

हे सर्व पाहून क्रोधित झालेल्या शिवाने मार्तंड भैरवाचे रूप धारण केले, ज्याला खंडोबा देखील म्हणतात,

नंदीवर स्वार होऊन पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी दोन्ही राक्षसांना मारले.

असे म्हणतात की या रूपात मार्तंड भैरव तेजस्वी सोनेरी सूर्यासारखे दिसत होते, त्यांच्या संपूर्ण शरीरावर हळद लावली होती त्यामुळे त्यांना हरिद्रा असेही म्हणतात.

भगवान मार्तंड यांनी दोन्ही असुरांचा वध केल्यावर, मरताना मणिने त्याला आपला पांढरा घोडा प्रायश्चित्त म्हणून अर्पण केला आणि वरदान मागितले.

मानवजातीच्या भल्यासाठी खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात त्याची प्रतिष्ठापना होणार हे वरदान होते. खंडोबाने आनंदाने हे वरदान दिले.

उलट मल्लांनी मानवजातीचा नाश व्हावा असे वरदान मागितले.

त्यामुळे भगवान क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांचे मस्तक धडा पासून वेगळे केले आणि मंदिराच्या पायरीवर मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना पायदळी तुडवायला सोडले.

शंकरांनी या भूमीवर मार्तंड भेंरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. ब्रह्मांड पुराणात या आख्यायिकेचा उल्लेख आहे.

मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली.

मार्तंड भेंरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरात नांदतच होते.

सण-उत्सवात ‘येळकोट येळकोट’ आणि ‘जय मल्हार’च्या जयघोषाने हवेत हळद (भंडारा) फेकून भाविक आनंद साजरा करतात.

या प्रथेचा एक सिद्धांत असा आहे की हळद हे सोन्याचे प्रतीक आहे आणि अशा प्रकारे, हळद हवेत फेकून, भक्त देवाला त्यांना भाग्य आणि संपत्तीचे आशीर्वाद देण्यास सांगत आहेत.

तथापि, इतरांचा असा विश्वास आहे की हे भगवान खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांच्या मिलनासाठी केले जाते. हा संपूर्ण अनुभव रोमांचकारी आणि पाहण्यासारखा आहे.

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे.

मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे.

चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो.

श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे.

माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचा.

श्री खंडोबारायाची पाच प्रतीके

लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. 

तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते. 

मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात. 

मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 

टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात.

खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात.

स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.

हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.

महाराष्ट्रातील 12 प्रसिद्ध मंदिरे : 12 Famous Temples of Maharashtra

संदर्भ

https://www.khandoba.com/index

https://www.youtube.com/watch?v=Zjj7kJZ1yu8

Leave a Reply