चतुशृंगी मंदिर : Chattushringi Mandir
चतुशृंगी माता मंदिर : Chattushringi Mata Mandir

चतुशृंगी मंदिर : Chattushringi Mandir

चतुशृंगी मंदिर

या मंदिराच्या पहिल्या शब्दाचा अर्थ चतु: म्हणजे चार, म्हणूनच हे मंदिर चार शिखराच्या डोंगरावर स्थापित आहे.

हे मंदिर जमिनी पासून ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे.

पुण्याच्या सेनापती बापट रोड वर हे मंदिर आहे.

चतु:शृंगी देवी ही या मंदिराची मुख्य देवता आहे.

देवीला अंबरेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते.

मंदिराकडे जाण्यासाठी १०० पायऱ्या चढून जावे लागते.

इथे दुर्गादेवी आणि गणपतीचे ही मंदिर आहे.

तसेच इथे आपण वेताळ महाराजांचे ही दर्शन घेऊ शकता.

हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

या मंदिराचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले होते.

या मंदिराच्या देखभालीचे काम चतु:शृंगी देवस्थान ट्रस्ट कडे सोपवले आहे.

दरवर्षी लाखो भाविक दूर वरून देवीच्या दर्शनासाठी येतात.

हे मंदिर सामर्थ्य आणि श्रद्धेचं प्रतिक मानले जाते.

चतुशृंगी मंदिराची पौराणिक कथा

चतुशृंगी मंदिराची पौराणिक कथा आहे, दुर्लभसेठ पितांबरदास महाजन नावाचा श्रीमंत व्यापारी होता.

तो सप्तशृंगी मातेचा मोठा भक्त होता.

तो दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीच्या दर्शनाला पुण्याहून वणीला जायचा.

परंतु जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या वृद्धत्वामुळे त्यांच्या ह्या दर्शन परंपरेत खंड पडू लागला.

ही गोष्ट समजल्यावर एक दिवस देवी खुद्द त्याच्या स्वप्नात आली आणि तिने त्याला पुण्याच्या टेकडीवर असलेली देवीची मूर्ती खोदून काढायला लावली आणि त्याच जागेवर मंदिर बनवण्याचा आदेश दिला.

जेणेकरून ती नेहमी भक्तांच्या जवळ राहील.

देवीचा आदेश पाळुन त्या व्यापाऱ्याने देवीने सांगीतलेल्या जागी खोदकाम केले, त्याला अतिशय अद्भुत मूर्ती मिळाली.

तिथेच त्याने भव्य मंदिर बनविले.

हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे.

चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.

मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने स्वयंप्रेरणेने अर्पण केले आहे.

Leave a Reply