अक्षय तृतीया चे महत्त्व : Akshay Tritiya
अक्षय तृतीया चे महत्त्व : Akshay Tritiya

अक्षय तृतीया चे महत्त्व : Akshay Tritiya

अक्षय तृतीया.. आखाजी….साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असा हा दिवस!

अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा आणि दान केलेल्या गोष्टीचा क्षय होत नाही असे म्हणतात.

त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व म्हटले जाते.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करतात .

अक्षय तृतीया का साजरी करतात ?

अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत श्री गणेश कडून लिहून घेण्यास सुरुवात केली.

श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.

भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठीरास सांगितले की,

“या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे.

देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते..”

या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.

ह्याच दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वी वर अवतरली होती.

भगवान शंकर ने ह्या दिवशी भगवान कुबेरला माता लक्ष्मी ची पूजा करण्यास सांगितले होती त्यानंतर हि परंपरा आज तायात सुरु आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडव पुत्र युधिष्टिर ला अक्षय पात्र भेटले होते. याचे महत्व हे होते कि, यातले भोजन कधीही संपत नव्हते .

Portronics Power Plate 7 with 6 USB Port + 8 Power Sockets Smart Electric Universal Extension Board Multi Plug with 2500W, 3Mtr Cord Length, 2.1A USB Output(Black)

Leave a Reply