सिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak
सिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak

सिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील प्रभादेवी मधील सिद्धिविनायक मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.

मुंबईत राहणाऱ्या माणसाला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहित नाही असे होणारच नाही.

हे मंदिर लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 1801 मध्ये बांधले होते.

हे मंदिर जगभर प्रसिद्ध असल्यामुळे देश-विदेशातून लोक गणपतीच्या दर्शनासाठी येतात.

सिद्धिविनायक मंदिराच्या निर्मिती मागील कथा ही देवावरील श्रद्धा आहे.

हे मंदिर देउबाई पाटील नावाच्या एका संपन्न शेतकरी महिलेने बांधले होते. त्यांना स्वतःची मुले नव्हती.

देउबाई पाटील यांनी गणपतीचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता.

कारण इतर निपुत्रिक जोडप्यांच्या इच्छा सिद्धिविनायक पूर्ण करू शकेल आणि संतती प्राप्त करू शकेल .

सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण झाले.

मंदिराची मूळ रचना घुमटाच्या आकाराच्या शिखराने सुशोभित केलेली चौकोनी इमारत होती.

रामकृष्ण जांभेकर महाराज हे हिंदू संत अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य होते.

स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी सध्याच्या मूर्तीसमोर दोन मूर्ती पुरल्या होत्या. स्वामी समर्थांनी भाकीत केले होते.

पुरलेल्या मूर्तींमधून मंदारचे झाड 21 वर्षांनंतर उगवले आहे, ज्याच्या फांद्यांमध्ये स्वयंभू देवाची प्रतिमा आहे.

त्या मागची सविस्तर कथा अशी

श्री स्वामी समर्थ व सिद्धी विनायक मंदिर🌺

या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी, अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे.

अक्कलकोट स्वामी व श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात एक आई आणि मुलाचे नाते होते.

असेच एकदा स्वामी व जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक स्वामी त्यांना म्हणाले,

”  रामकृष्णा तुला काय हवे? “

प्रत्यक्ष ब्रह्माण्ड आपल्या हातात गोटीच्या “स्वरूपात” धारण करणारे परब्रम्ह देण्यासाठी समोर असताना, जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही.

ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको. स्वामी तुम्हाला काही द्यायचे असल्यास,

आपण माझ्या “सिद्धिविनायकाला वैभव द्या.”

हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने, स्वतःसाठी काही न मागता ईश्वरा साठी मागितले.

ईश्वरा ला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगा च्या अंतापर्यंत देत राहील.

एका मागणी मध्ये दोन हेतू, साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली.

स्वामींनी आपल्या आजानु-बाहुंनी महाराजांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले

“तुझ्या सारखा शिष्य मला लाभला हे माझेच भाग्य आहे. तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा  तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तुझा हा मंदार वृक्ष इंचाइंचाने वाढेल तस-तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल.

ज्या दिवशी तो मंदार वृक्ष बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल.” 

श्री स्वामीं-नी तथास्तु म्हटले आणि वट-वृक्षाच्या दिशेने स्वामी अंत-र्धान पावले. 

चौथ्या दिवशी जांभेकर महाराज प्रभादेवीला आले.

त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले व त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली 

“स्वामी मी माझे काम केले. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. असे बोलून महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो व तुला या जगात वैभव प्राप्त होवो.

या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवो, व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनो-कामना पूर्ण होवोत.

श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला.

जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितले ले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले व त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तस तशी सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. 

श्री स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छे खातर “प्रभादेवी च्या सिद्धिविनायकाला सुद्धा वैभव प्राप्त करून दिले.”

श्री स्वामी समर्थांचे आशीर्वादाने सिद्धिविनायक मंदिर मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही.

Leave a Reply