गजानन महाराज प्रकट दिन :Gajanan Maharaj Prakat Din
गजानन महाराज प्रकट दिन-Gajanan Maharaj Prakat Din

गजानन महाराज प्रकट दिन :Gajanan Maharaj Prakat Din

गजानन महाराज प्रकट दिन : Gajanan Maharaj Prakat Din 2023

श्री संत गजानन महाराज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात प्रथम प्रकट झाले. त्याच्या प्रथम दर्शनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि प्रकट दिन म्हणून साजरी केली जाते.

माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजे दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. तो दिवस शनिवार होता.

या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे “श्रीं” च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे.

  “श्रीं संत गजानन महाराज”चा प्रकट होण्याचा प्रसंग

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात वटवृक्षाखाली माध्यान्ह वेळी ऐन तारूण्याअवस्थेत एकदम प्रगट झाले.

उष्ट्या पत्रावळीतील भातशेते निजलीलेने वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत यांना श्री गजानन महाराज दिसले.

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.

तो दिवस होता माघ वद्य सप्तमी. हाच दिवस “श्रीं” चा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.

या वर्षी “श्रीं” चा १४5 वा प्रकट दिन आहे.

महाराजांबद्दल थोडक्यात माहिती

गजानन महाराजांच्या जीवनातील विविध पैलू ‘श्री गजानन विजय ग्रंथ‘ या ग्रंथात संकलित केले आहेत. हा ग्रंथ दास गणु यांनी लिहिला आहे.

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने “आंध्रा योगुलु” नावाच्या पुस्तकात लिहिले आहे. 

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. 

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवात व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे.

उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.

“गण गण गणात बोते” आणि “जय गजानन” चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन शेगाव येथे सोहळा साजरा करण्यात येतो.

Dabur Organic Honey | 100% Pure and Natural | NPOP Organic Certified | Raw , Unprocessed , Unpasteurized Honey | No Sugar Adulteration – 300gm

गजानन महाराजांनी8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन समाधी घेतली जी एखाद्याच्या शारीरिक शरीरातून ऐच्छिक माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते.

या 32 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक चमत्कार केले आणि शेगाव येथे गजानन महाराज आजही आपल्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्यांसमोर प्रकट होतात.

ते खरोखर कुठून आले हे कोणालाच माहीत नाही.

!!स्पर्श तया भक्तीचा होताच होतो जीवाचा उद्धार !!
!!तो नायक ब्रम्हांचा तयां चरणी नमस्कार !!
!! गण गण गणांत बोते !!
!! जय गजानन !!
!! श्री गजानन !!

Leave a Reply