दत्त परिक्रमा: Datta Parikrama
दत्त परिक्रमा: Datta Parikrama

दत्त परिक्रमा: Datta Parikrama

श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता आणि आशीर्वाद मिळवून देणारी परिक्रमा आहे.

श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात, त्याला बळ देतात, त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात, असे मानले जाते.

श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत. या २४ गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे.

श्रीदत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वाना सामावून घेणारे आहे.

संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत.

 महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते.

दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील आहेत.

Amazon Brand – Vedaka Sona Masoori Rice, Steamed, 5kg

या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे.

त्याचा क्रम खालीलप्रमाणे:

१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे            
२. औदुंबर                             
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी                                               
५. अमरापूर                           
६. पैजारवाडी    
७. कुडुत्री                                                    
८. माणगाव                            
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड                                                  
११. कुरवपूर                        
१२. मंथनगुडी    
१३. लाडाची चिंचोळी                         
१४. कडगंजी                         
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर                                               
१७. अक्कलकोट                  
१८. लातूर    
१९. माहूर                                                    
२०. कारंजा                           
२१. भालोद
२२. नारेश्वर                                                   
२३. तिलकवाडा                     
२४. गरुडेश्वर

एकूण साधारण 3,६०० कि.मी.चा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो.

भक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal

श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत.

दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे.

दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.

१. श्रीपाद श्रीवल्लभ
२. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज
३. श्रीस्वामी समर्थ महाराज
४. श्रीमाणिकप्रभू महाराज
५. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर
७. चिदंबर दीक्षित स्वामी महाराज
८. दीक्षित स्वामी महाराज
९. गुळवणी महाराज
१०. चिले महाराज
११. श्रीधर स्वामी
१२. श्री सायंदेव
१३. श्री सदानंद दत्त महाराज
१४. रंगावधूत महाराज
१५. श्रीशंकर महाराज

श्रीदत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यामध्ये घालवतो.

श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यात गेला आहे.

कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठय़ा नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो.

गाणगापूर येथे भीमा- अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते.

याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते. इतर अनेक लहानमोठय़ा नद्यांचे दर्शन होते.

श्रीदत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते. त्यामुळे ही तुलनेने सोपी आहे. शिवाय विविध दत्त क्षेत्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

Fire-Boltt Ninja 2 SpO2 Full Touch Smartwatch with 30 Workout Modes, Heart Rate Tracking, and 100+ Cloud Watch Faces, 7 Days of extensive Battery (Black)

Follow us Facebook

Leave a Reply