श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ
‘श्री स्वामी समर्थ’ चा अर्थ
षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हाही सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे.
श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास ‘स्वाः + मी’ अशी होते.
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
श्री
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज…!
स्वामी – स्वाः + मी
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या…! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
समर्थ
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा…!
त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
श्रीस्वामी समर्थ मंत्र जपाचे फायदे | श्री स्वामी समर्थ विचार –
जर आपण श्रीस्वामी समर्थ मंत्राचा रोज नियमित जप केला. त्यामुळे आम्हाला भरपूर फायदे मिळतात.
मंत्राचा उच्चार केल्याने आपल्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते.
व्यक्तीला आरोग्य लाभ मिळतो. आणि व्यक्ती मानसिक विकारांपासून दूर होते.
श्री स्वामी समर्थ मंत्राचे काही फायदे आम्ही खाली दिले आहेत.
- श्री स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते.
- मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते. आणि मानवी मन शांत आणि शांत राहते.
- ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो. त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा.
- श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते.
- या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळू शकतो.
- श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने घरातील मुलांचे शिक्षण सुधारते.
- या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल होतो. मानवी जीवन आनंदी होते.
- या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.
- श्री स्वामी समर्थांचे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. माणसाला आपले जीवन सुखी करायचे असेल तर. म्हणून श्रीस्वामी समर्थ मंत्राचा नियमित जप करा.

सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने
१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
२. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.
३. आळशी माणसाचे तोंडपाहू नये.
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
६. भिऊनकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
८. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
९. हम गया नही जिंदा है.
अजून हे वाचा…
श्री क्षेत्र पीठापूर- श्रीपादांचे जन्मस्थान