इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर
बैजनाथ महादेव मंदिर आगर माळवा (MP)इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर

इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर

इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर 

ब्रिटीशांनी शेकडो वर्षे भारतावर राज्य केले आणि बरीच चर्चेस आणि कॅथेड्रल्स बांधली.

परंतु 1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.

हे एकमेव मंदिर आहे जे इंग्रजांनी भारतात बांधले होते.

एका ब्रिटिश कुटुंबाची भगवान शंकरावर कशी भक्ती जडली, याची गोष्ट देखील वाचण्यासारखी आहे.

बैजनाथ-महादेव-मंदिर-आगर-माळवा-MP
बैजनाथ महादेव मंदिर आगर माळवा (MP)

कर्नल मार्टिन अफगाण युद्धावर गेला होता.

तो नियमितपणे आपल्या पत्नीला तेथील परिस्थितीची माहिती देऊन पत्र लिहित असे.

हे एक बराच काळ चाललेले युद्ध होते आणि हळूहळू कर्नलची पत्रे येणं बंद झालं.

श्रीमती मार्टिन त्यावेळी आगर माळवाच्या छावणीत राहत असत आणि कर्नलची पत्रे येण्याचे थांबल्यावर शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकायला लागली.

त्या चिंतातुर झाल्या.

एके दिवशी रपेट करत असताना ती बैजनाथ महादेव मंदिराच्या जवळून जात होती.

ते मंदिर तेव्हा ढासळलेल्या अवस्थेत होतं.

ती आरतीची वेळ होती आणि शंखांचा आवाज आणि मंत्राच्या जपाने तिला मोहित केलं.

ती आत गेली तेव्हा भगवान शिवाची आरती चालू होती.

पुजार्‍यांनी तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहिले आणि तिला विचारले की काय झाले आहे.

श्रीमती मार्टिनने तिची दु: खद कथा सांगितली.

पुजाऱ्यांनी तिला सांगितलं की भगवान शिव सर्व भक्तांच्या प्रामाणिक प्रार्थना ऐकतात आणि त्यांना संकटातून वाचवतात.

तिला एका पुरोहिताने 11 दिवस “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करण्यास सांगितले.

बैजनाथ महादेव मंदिर

नवरा युद्धातून सुखरूप घरी परत आल्यास मंदिर नव्याने बांधायचे आश्वासन देऊन तिने कर्नलच्या सुरक्षित परतीसाठी भगवान शिवाची आराधना केली.

११व्या दिवशी अफगाणिस्तानातून एक मेसेंजर तिच्या पतीचं पत्र घेऊन आला.

त्यात असे लिहिले होते की,

मी रणांगणावरुन नियमितपणे पत्र पाठवत होतो पण अचानक पठाणांनी आम्हाला घेरले.

मला पळून जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता.

इतक्यात अचानक मला एक योगी दिसला ज्याचे लांब केस होते, त्याने वाघाचं कातडं परिधान केलं होतं.

त्याचे व्यक्तिमत्त्व विस्मयकारक होते आणि त्याला पाहून मैदानातून पळून जाणाऱ्या अफगाणांविरूद्ध त्याने शस्त्र चालविणे सुरू केले.

त्याच्या कृपेने अटळ मृत्यूची शक्यता विजयात बदलली.

मग त्या महान योग्यानं मला सांगितले की मी काळजी करू नये आणि तो मला सोडवायला आला होता.

कारण तो माझ्या पत्नीच्या प्रार्थनांनी प्रसन्न झाला होता.”

जेव्हा तिने हे पत्र वाचले तेव्हा श्रीमती मार्टिनच्या डोळ्यांत आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू ओसरले.

तिचे हृदय भारावून गेले.

तिने भगवान शिवाच्या मूर्तीला लोटांगण घातले.

काही आठवड्यांनंतर लेफ्टनंट कर्नल मार्टिन परत आला आणि त्यांच्या पत्नीने तिला तिची कहाणी सांगितली.

हे जोडपे भगवान शिवभक्त झाले.

1883 मध्ये त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.

बैजनाथ महादेव मंदिरात असलेल्या शिलालेखावर ही माहिती कोरली आहे.

इंग्लंडला परत गेल्यावर तिथेही आपल्या घरी शिव मंदिर बनवून आयुष्यभर त्याची पूजा करू असा ठाम संकल्प घेऊन तो इंग्लंडला रवाना झाला.

||ओम नमः शिवाय||

Leave a Reply