कराग्रे वसते लक्ष्मी: मंत्र,अर्थ आणि फायदे
करदर्शन मंत्र - Karagre vasate laxmi

कराग्रे वसते लक्ष्मी: मंत्र,अर्थ आणि फायदे

कराग्रे वसते लक्ष्मी: मंत्र,अर्थ आणि फायदे

हातांच्या दर्शनाचा मूळ भाव हाच आहे की, आपला आपल्या कर्मावर विश्वास पाहिजे.

त्यामुळे आपण देवाला प्रार्थना करतो की, आमच्या हातून असे कर्म घडू देत ज्यामुळे जीवनात धन, सुख आणि ज्ञान प्राप्त होईल.

तसेच आमच्या हातून असे कर्म घडू देत ज्यामुळे दुस-यांना देखील लाभ होईल.

आमच्या हातून कधीच चुकचे कार्य घडू देऊ नकोस.

करदर्शन करताना दोन्ही हातांची अंजुली करून त्यात मन एकाग्र करून पुढील मंत्र म्हणा. 

करदर्शन मंत्र

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

अर्थ

कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झाली आहे.

करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे.

करमूले तू गोविंदम म्हणजे कराच्या मुख्यभागी श्री विष्णूंचा वास आहे.

प्रभाते करदर्शनम म्हणजे अशा लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्रीविष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो.

आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात.

त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभु बरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात.

शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता, रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे.

भूमिवन्दन

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । 

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥

अर्थ : समुद्राचे वस्त्र परिधान करणारी, पर्वतासारखी स्तने असलेली आणि भगवान विष्णूची पत्नी असलेल्या भूमीदेवी, मी तुला नमस्कार करतो. माझ्या चरणांचा तुला स्पर्श होईल. यासाठी मला माफ कर.

फायदे

ज्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनातील संघर्षांवर मात करायची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र फायदेशीर आहे.

हे तुम्हाला एकाग्रता प्राप्त करण्यास मदत करते

औपचारिकपणे चांगले करण्याचा तुमचा हेतू मजबूत करते.

हे आत्मविश्वास आणि मनाची स्पष्टता प्राप्त करण्यास मदत करते.

Boldfit Resistance Bands for Workout Dual Color Heavy Resistance Band for Stretching, Pull ups, Home Exercise Resistance Band for Gym Workout Stretch for Men and Women

Leave a Reply