शुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana

प्रार्थना

शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदाम
शत्रुबुद्धी विनाशाय
दिपज्योती नमोस्तुते

दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी

तिळाचं तेल कापसाची वात
दिवा जळूदे सारी रात
घरातली पीडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो.

(घरच्या धन्याला असं आहे वरच्या ओळीत. आम्ही घरच्या सर्वांना म्हणतो बदलून)

Leave a Reply