श्री नवनाथ स्तोत्र : Shri Navnath Stotra
नवनाथ स्तोत्र : Navnath Stotra

श्री नवनाथ स्तोत्र : Shri Navnath Stotra

[google-translator]

नवनाथ स्तोत्र

नाथसंप्रदायात नऊ नारायणांनी पृथ्वीवर नवनाथ म्हणून अवतार घेतला आहे.

श्री नवनाथ हे नऊ महान संत आहेत ज्यांनी भगवान दत्तात्रेय यांनी सुरू केलेल्या नवनाथ संप्रदायाचा जगात प्रसार केला.

हे नऊ संत खरे तर नऊ महामानव आहेत ज्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने, नि:स्वार्थीपणाने, तपस्वीपणाने, आपल्या गुरू भगवान दत्तात्रेयाबद्दलची भक्ती आणि मंत्रशक्तीने भगवान शिव, भगवान विष्णू, हनुमान, वीरभद्र, इंद्र, देवी चामुंडा, भूत या देवतांचा पराभव केला.

या नऊ संतांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या पावन चरणी आत्मसमर्पण करण्यासाठी श्री नवनाथ स्तोत्राचा जप केला जातो.

नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक गुरु मच्छिद्रनाथ यांना दत्त संप्रदायाचे निकटवर्तीय मानलं जाते.

तसचं, नाथ परंपरे नुसार गुरु नवनाथ महाराज यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेय महाराज यांच्याकडून मिळाली असल्याची मान्यता आहे.

यावरून असे गृहीत धरण्यात येते की, नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भिन्नता आढळून येत असली तरी, दत्त गुरू यांनी दोन्ही संप्रदायाना दीक्षा दिली असल्याने ते दोन्ही संप्रदायाकरिता पूजनीय आहेत.

नवनाथ महाराज यांच्या उत्पत्तीसंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी, त्यांच्या उत्पत्ती संबंधित लोकांमध्ये बरेच मतभेद आहेत. नाथांचे नवनाथ कोण याबाबतीत अभ्यासकांचे सुद्धा  एकमत नाही.

नाथ संप्रदायाची अशी मान्यता आहे की, नाथ संप्रदायाला सिद्धी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात.

नाथ संप्रदायाबाबत विशेष माहिती सांगायची म्हणजे, महाराष्ट्र राज्यात या संप्रदायाचे लोक जास्त करून आढळतात.

संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी सांप्रदायिक असले तरी, त्यांनी नाथ सांप्रदायिकांची दीक्षा घेतली होती.

संत ज्ञानेश्वर महाराज यांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडिल बंधू गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडून मिळाली.

Amazon Brand – Symbol Men’s Regular T-Shirt

त्यामुळे, संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी सांप्रदायिक असल्याने नाथ संप्रदायाचा संबंध वारकरी संप्रदायासोबत जोडल्या गेला.

श्री नवनाथ स्तोत्र

— नवयोगीन्द्रनाथस्तोत्रम् —

वन्दे श्रीभगवद्रूपं कविं योगीन्द्रसंज्ञकम् ।
मच्छेन्द्रनाथं श्रीदत्तशिष्येन्द्रनवनाथकम् ॥१॥

वन्देहं भगवद्रूपं हरिं गोरक्षसंज्ञकम् ।
नाथं द्वितीयं मच्छेन्द्रशिष्येन्द्रं द्वैतवर्जितम् ॥२॥

वन्दे जालन्धरं नाथं योगीन्द्रं चान्तरिक्षकम् ।
तच्छिष्यं कानिफं वन्दे प्रबुद्धं बुद्धिनायकम् ॥३॥

वन्देहं चर्पटीनाथं पिप्पलायनसंज्ञकम् ।
आविर्होत्रं च योगीन्द्रनागनाथं नमाम्यहम् ॥४॥

नमो भर्तरीनाथाय योगीन्द्रद्रुमिलाय च ।
नमो रेवणसिद्धाय चमसाय च योगिने ॥५॥

नमो गहिनीनाथाय करभाजनयोगिने ।
प्रणमामि श्रीनिव्रुत्तिनाथं ज्ञानेश्वरं तथा ॥६॥

सोपानं मुक्तिजननीं दत्तछात्रपरम्पराम् ।
वन्दे दत्तगुरुं वासुदेवं गुरुपरात्परम् ॥७॥

योगिराजावतारं तं योगज्ञानाब्धिनाविकम् ।
मूलप्रकृतिकविष्ण्वीशावतारा: पान्तु न: सदा ॥८॥

इति नवयोगीन्द्रस्तोत्रम्

Amazon Brand – Symbol Men’s Regular Shirt

Leave a Reply