श्री हनुमान आरती : Shri Hanuman Aarti
श्री हनुमंताची आरती:Shri Hanuman Aarti

श्री हनुमान आरती : Shri Hanuman Aarti

Shri Hanuman Aarti

(श्री हनुमान आरती )मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |
कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||

जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥ ||धृ||

दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मनिला खेद |
कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद |
रामी रामदास शक्तीचा शोध ||2||

जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥

-श्री रामदास स्वामी

श्री हनुमान आरती 2

जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु० ॥

वानरूपधारी । ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय० ॥ १ ॥

सीतेच्या शोधासाठीं । रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥ २ ॥

सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले । मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी । तवं केले दहन ॥ जय० ॥ ३ ॥

निजबळे इंद्रजित । होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला । लघुशंका करून ॥
देखोनी पळताती । महाभूते दारुण ॥ जय० ॥ ४ ॥

राम हो लक्षुमण । जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजि मर्दिले ॥ जय० ॥ ५ ॥

देउनी भुभुःकार । नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा । त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी । अयोध्येसी आणिले ॥ जय० ॥ ६ ॥

हनुमंत नाम तुझे । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी । हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी । मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥ ७ ॥

https://amzn.to/48RcJMP

https://amzn.to/3uhtCRx

Leave a Reply