शनि देवाची आरती, मंत्र : Shani Dev Aarti, Mantra
शनि देवाची आरती,मंत्र : Shani Dev Aarti, Mantra

शनि देवाची आरती, मंत्र : Shani Dev Aarti, Mantra

शनि देवाची आरती

शनी देवाला तेल, उडीद, आणि रुईच्या फुलांचा हार प्रिय आहे.

आणि म्हणूनच हे अर्पण करून शनी देवाची मनोभावे पूजा केली जाते.

शनि देवाची कृपादृष्टी मानवाप्रमाणेच देवी देवतांवरही आहे.

शनीचा प्रकोप आपल्यावर होऊ नये यासाठी शनि देवाला अनन्य साधारण महत्त्व पुराणात देण्यात आलंय.

पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये शनिचा कर्म आणि न्याय देवता असाही उल्लेख केल्याचं पाहायला मिळतं.

शनिदेवाच्या आरतीला विशेष महत्त्व आहे.

केवळ अमावस्याच नाही तर नियमितपणे आरतीचं पठण करावं.

शनि देवाची आरती

जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा

ज्यावरी  कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||

विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||

शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||

प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||

ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||

दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||

जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||


शनि देवाचा मंत्र

‘सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:। मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:।।’ 

ईडा-पिडा टाळण्यासाठी आणि शनि देवाच्या कृपादृष्टीसाठी या मंत्राचे पठण करा.

मंत्राचा १०८ वेळा जप करा.

शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी या मंत्रांचा जप करा

  • शनि बीज मंत्र- ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
  • सामान्य मंत्र– ॐ शं शनैश्चराय नमः।
  • शनि महामंत्र
    • ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
  • शनि वैदिक मंत्र-  ऊँ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।
  • शनि गायत्री मंत्र­– ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।
  • शनि दोष निवारण मंत्र- 
    • ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम। उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।। ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।शंयोरभिश्रवन्तु नः। ऊँ शं शनैश्चराय नमः।।
SHAYONAM Multifunctional Screen Brush 2 in 1 Mesh Cleaning Brush & Wiper with Extended Handle Window Cleaning Brush Window Net Cleaner Double-Sided Window Cleaner Window Mesh Cleaner (pack of 1)

Leave a Reply