दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती यांनी आपल्या तीर्थाटनात अनेक ठिकाणी वास्तव्य करून तपाचरण केलं.
त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला.
अशा ठिकांणांना दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आणि आज ही स्थानं दत्त क्षेत्रं म्हणून ओळखली जातात.
त्यापैकी औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर या तीन महत्त्वाची स्थाने आहेत.
सांगली या जिल्ह्य़ाच्या ठिकाणापासून केवळ ३० किलोमीटरवर असणाऱ्या या क्षेत्री जाण्यासाठी नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.
तर पुणे, कोल्हापूर रेल्वे मार्गावरील भिलवडी स्थानकापासून 7 किलोमीटरवर औदुंबर आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे.
नृसिंहसरस्वती आपल्या तीर्थाटनादरम्यान नृसिंहवाडीच्या आधी औदुंबर क्षेत्री राहिले होते. १४२१ सालच्या चातुर्मासात त्यांचा निवास कृष्णातीरावरील या मनोहारी वनात होता.
कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे.
भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे.
कृष्णा नदीच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते.
या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबरा च्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
याच ठिकाणी त्यांनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला. औदुंबर वृक्षात माझा नित्य वास राहील असं त्यांनी सांगितलं.
या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबर वृक्षा च्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे.
औदुंबराचं वन आज दत्त क्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात येथील वास्तव्यादरम्यानच्या नृसिंहसरस्वतीच्या कार्याचं वर्णन केलं आहे.
१९०४ साली ब्रह्मानंदस्वामी हे गिरनार पर्वती असणारे सत्पुरुष येथे आले आणि त्यांनी हे क्षेत्र प्रकाशात आणलं.
कृष्णातीरावरील विस्तीर्ण घाट आणि औदुंबराचं वन यामुळे हे क्षेत्र साधनेसाठी प्रसिद्ध होत गेलं.
कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली.
ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे.
याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले.
याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला, व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील.
व त्यावृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्याभक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन दिले.
Mi Step Out 12 L Mini Backpack (Small Size, Dark Blue, Water Repellant)