श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
श्री स्वामी समर्थ
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले.
ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.
तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामींचा 2024 मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी प्रकट दिन आहे.
प्रकट पूर्वपिठिका
इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले.
ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.
ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.
एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली व ती वारूळावर पडली.
उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते.
कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले.
गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची हकीकत.
स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले.
त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी.
शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता.
त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा.
तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती.
तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा. आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा.
असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला.
तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया.
विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे.
तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले ”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” .
बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले.
कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती.
आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज.
आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले.
थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला.
आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली?
पण या गोष्टीचा उलगडा असा झाला.
कोकणातील हरिभाऊ (स्वमिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते.
एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि,” आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे.
आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर.” हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते.
महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि,
“रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.”
ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले.
त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता.
त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.
या गोष्टीला स्वतः स्वामीनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे.
श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ : Shri Swami Samarth Mantra Jap Labh
स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरु केला आहे.
ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते, तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वामीसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते,
”माझ बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.”
नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वामिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते.
तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते.
स्वामीनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल.
आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता, तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता.
तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामीनी कुंडली आणण्याची आज्ञा केली.
तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती.
आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला.
आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावर.
याचाच अर्थ स्वामीनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले.
आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे.
स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः चे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते.
श्री स्वामी चरित्र सारामृत : Shri Swami Charitra Saramrut
पूर्णब्रह्मस्वरुप अवतार
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते.
भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे.
कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात.
महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.
श्री स्वामी जयघोष
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र : Shri Swami Samarth Tarak Mantra
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी
ज्ञानामृताचा घट “श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पोथी” या ग्रंथरूपाने श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा समस्त भक्तांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
श्री स्वामीस्वरूप सदगुरू प. पू. श्री शरदजी ब. लाठकर काका यांच्या अमृतवाणीद्वारे जी प्रबोधने आविष्कृत झाली आहेत. त्याचे ओवीबद्ध रुपांतर म्हणजेच ही पोथी होय.
स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताच कलश भक्तांसमोर प्रस्तुत केला आहे.
या दयाघन कृपावंत सदगुरूंचे ऋण फिटणे केवळ अशक्य!
सदगुरूंनी आम्हांस सदैव त्यांच्या कृपा छत्राखाली असु द्यावे ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.
जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करील त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सदगुरू श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे, याचे निरंतर स्मरण ठेवावे.
प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावा तसेच स्वामी प्रकटदिन सप्ताहात अवश्य पारायण करावे.