श्री दुर्गा देवीची आरती : Shri Durga Devi Aarti
Shri Durga Devi Aarti
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।। धृ० ।।
त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।