निर्वाण षट्कम – Nirvana Shatakam Stotra
आदि शंकराचार्यांनी निर्वाण शतकम स्तोत्रम् रचले आहे.
षट्कम हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ सहा आणि निर्वाण शटकम श्लोकात सहा श्लोक आहेत.
निर्वाणषट्कम स्तोत्रम् “शिवोहम” या शब्दाची पुनरावृत्ती करतो ज्याचा अर्थ “मी शिव आहे”.
हे अर्थगर्भ षटक होय.
सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा.
त्याला ‘निर्वाणषटकम्’ Nirvana Shatakam Stotra किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात.
या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे.
अद्वैत सिद्धांतानुसार ‘मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे’ असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.
शेवटच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे आत्मा हे वैश्विक तत्त्व परमेश्वरस्वरूप असून आनंदाने परिपूर्ण आहे.
॥ निर्वाणषट्कम ॥
मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्रणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 1 ॥
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशाः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायू चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 2 ॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 3 ॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 4 ॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 5 ॥
अहं निर्विकल्पॊ निराकाररूपॊ विभुत्वाञ्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥ 6 ॥
इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं निर्वाणषट्कं संपूर्णम ॥