तुळजाभवानी आरती : Tulja Bhavani Aarti
तुळजाभवानी आरती - Tulja Bhavani Aarti

तुळजाभवानी आरती : Tulja Bhavani Aarti

तुळजाभवानी आरती – Tulja Bhavani Aarti

जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥

कृतयुगाचे ठायिं दैत्य म्हैसासुर प्रगटला हो ।
त्याच्या त्रासाभेणें मोठा हाहा:कार उठला हो ॥

गाईच्या रूपानें पृथ्वी ब्रह्माचें जाउन हो ।
होती जालि कष्टि अपुलें गार्‍हाणें सांगुन हो ॥
तेव्हां हरिहरव्रह्मा आले तुजलागीं शरण हो ॥

वंदुनिया स्तुतिस्तवनें अंबे करिति तव विनवणी ।
रक्षी विश्वजगातें ह्मणवुनि लागति ते चरणीं हो ।
अभयवरातेम देउनि सुरवर पाठविले ते क्षणीं हो ॥

नाना अयुधें सेवुनि धरिला अष्टभुजा अवतार हो ।
अउट कोटि चामुंडा घेऊनि सांगातें हो ।

सिंहारुढ होउनिया केला दैत्यांचा संहार हो
हेल्याच्या रूपानें पळतां जाला ह्मैसासुर हो ।

ते काळीं शस्त्रानें उडवुनि दिधलें त्याचें शिर हो
जयजयकारें सुरवर करिति निरंजन परिकर हो ॥

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची सकाळची नित्य महा आरती

जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||
जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||
नैसुनी पाटाउ पिवळा, हार शोभे गळा |
हाती घेउनिया त्रिशूळा | भाळी कुमकुम टिळा || जय जय भवानी || १ ||

जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||
अंगी लयुनिया काचोळी, वर मोत्यांची जाळी |
ह्रुदयी शोभतसे पदकमली | कंठी हे गरसोळी || जय जय भवानी || २ ||

जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||
पायी घांगरीया रुण झुन, नाकी मुक्ताफाळ |
माथा केश हे कुरळ | नयनी हे काजळ || जय जय भवानी || ३ ||

जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||
सिंहावरी तू बैसुनी, मारिती दानवगण |
तुजला विनवितो | निशी दिन गोसावी नंदन || जय जय भवानी || ४ ||

जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी || धृ ||

https://amzn.to/3SgZsWP

शंकराची आरती : Shankarachi Aarti

श्री गणपतीची आरती : Shri Ganpatichi Aarti

Leave a Reply