Vindhyavasini Temple, Chiplun- विंध्यवासिनी देवी, चिपळूण
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनी मंदिर आहे.
भारतातील बारा शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्य पीठ उत्तर प्रदेशात विंध्याचल येथे आहे. तिचे अंशपीठ रावतळे-चिपळूण येथील विंध्यवासिनी आहे.
देवीचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र वद्य प्रतिपदा या काळात साजरा होतो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा व नवरात्रोत्सवात मोठी गर्दी होते.
प्राचीन कथा सांगते की ती नंद आणि यशोदा यांची कन्या होती जी कृष्णाच्या ऐवजी वसुदेव आणि देवकीला बंदिवासात ठेवली होती.
आणि कंसाने तिला मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि विंध्य पर्वतावर राहायला गेली.
विंध्यवासिनीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन आहे आणि प्राचीन काळापासून तिची पूजा केली जात होती.
आदिलशाही काळात चिपळूण व कोकण प्रांतावर बाराराव कोळ्यांचे राज्य होते.
हे ‘राव’ ज्या भागात राहायचे तेच रावतळे होय.
या कोळ्यांचा पाडाव करण्यासाठी शेख बहाद्दूर चिपळूणवर चालून आला. रावतळ्याच्या वेशीवर युद्ध झाले.
जर यामध्ये कोळ्यांचा पराभव झाला तर शत्रू आपली कुलदेवता भ्रष्ट करेल या भीतीने कोळ्यांनी श्री विंध्यवासिनी देवीच्या मंदिरावर दगड रचले व डोंगरातील मातीखाली मंदिर गाडून टाकले.
मात्र, शेख बहाद्दूर कोळ्यांकडून ठार झाला.
परंतु श्री विंध्यवासिनी देवीचे मंदिर त्याच स्थितीत अनेक वर्षे राहिले. त्यामध्ये मूर्तीचे दोन हात खंडित झाले.
अनेक वर्षांनंतर राजा संभाजीने हे मंदिर पुन्हा मूळ वैभवात आणले. तेव्हापासून देवीची रोज पूजा केली जाते.
1976 मध्ये मंदिराच्या स्थापनेचा 300 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
९८३ साली झालेल्या पावसात या मुल मंदिराचे मोठे नुकसान झाले , आता त्याचा जीर्नोद्धार झालेला आहे .
१५-२० उभ्या पायऱ्या चढून गेलो कि आपण सभामंडपात पोहोचतो .
देवीची मूर्ती होयसल शैलीची असल्याने ती जवळपास ८००-१००० वर्षे जुनी असावी.
मूर्ती अतिशय सुंदर असून महिषासुर मर्दिनीच्या आक्रमक रूपात उभी आहे.
या अष्टभूजांमध्ये विविध आयुधे आहेत. पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे .
रेड्याचे शीर धडावेगळे होऊन पडलेले आहे . शेजारीच सहा तोंडाच्या कार्तीकेयाचीही सुंदर मूर्ती आहे .
स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेत नाहीत म्हणून ती झाकून ठेवलेली आहे .
दोन्ही शिल्पे अत्यंत उत्कृष्ट असून त्यावरील कोरीव काम , सुबकता , काळ्या पाषाणाची चकाकी यामुळे कलाकारां बद्दलचा आपला आदर द्विगुणीत होतो.