श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम
दत्तात्रेय आणि परशुराम कथा:Dattatrey And Parshuram Story

श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम

परशुराम

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते.

सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदुराजा, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात.

या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे. 

या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.

Swayam Floral Cotton Bolster Cover (75 x 75 cm, Multicolour) -Set of 2

मागच्या लेखात आम्ही यदुराजा कसे दत्तात्रेयांचे शिष्य झाले ते पाहिले आज आपण परशुराम ला कसे शिष्य केले ते सांगितले आहे.

ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम.

त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे.

जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले.

त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली.

त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले.

ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला.

त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा असे वर मागितले.

जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता.

त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते.

ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते.

प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते.

तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती.

एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते.

कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता.

भगवान परशुराम
भगवान परशुराम

अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली, त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले.

परशुरामने बर्‍याच राजांना ठार मारले होते आणि आपल्या शक्तींचा उपयोग करण्याच्या नकारात्मक बाजूचे वर्णन केले म्हणूनच त्यांनी स्वतःला अध्यात्माशी जोडण्याचे ठरविले.

परशुराम दत्तात्रेय आश्रमात गेले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती जी रक्ताने डागलेले होते.

जेव्हा त्यांनी आश्रमात प्रवेश केला तेव्हा आत असलेले सर्व लोक आपल्या घरी परत जात होते, हे सांगत होते की हे आध्यात्मिक स्थान नाही.

परशुराम आत गेले आणि त्यांनी पाहिले की दत्तात्रेयांच्या एका मांडीवर दारूचा घडा आहे आणि दुसऱ्या मांडीवर एका महिला बसली आहे.

दत्तात्रेय नशेत दिसत होते. काळ्या कुत्र्यांनी त्यांना वेढले होते.

परशुरामाला दत्तात्रेयांचे स्वरूप समजले म्हणून, परशुरामांनी दत्तात्रेयांना नमन केले. दत्तात्रेयांचे कमळ पाय धरले आणि स्वतःला दैवताशी जोडले.

परशुरामांनी दत्तात्रेयांना त्याचा शिष्य म्हणून स्वीकारण्यास सांगितले.

दारूचा घडा ही दिव्य अमृत होती आणि ती स्त्री अनघा माता होती.आणि ते चार कुत्री चार वेद होते.

परशुरामला समजले की दत्तात्रेय सांसारिक पैलूंच्या तुलनेत देवत्वाला स्पर्श करते.

ते योगींमध्ये श्रेष्ठ होते .

आपण कसे आहोत त्याप्रमाणे परमात्म्यापर्यंत कसे पोहोचायचे आणि अंतःकरणास शांतीने कसे जोडावे हे त्याने मार्ग दाखविला.

मोठी पापेसुद्धा तुम्हाला देवाकडे जाण्याच्या मार्गावर थांबवू शकत नाहीत. परशुरामने दत्तात्रेयातील आपल्या गुरूला ओळखले.

श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली.

श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद “श्री दत्तभार्गव संवाद” म्हणून प्रसिद्ध आहे.

‘त्रिपुरारहस्य’ नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजिवित्व बहाल केले.

त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यपऋषींना दान केली.

त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे.

याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना करतात.

आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे, अशी श्रद्धा आहे.

Swayam Assorted Brocket Cushion Cover Set of 5

Leave a Reply