घालीन लोटांगण मराठी अर्थ : Ghalin Lotangan Lyrics Meaning
घालीन लोटांगण मराठी अर्थ : Ghalin Lotangan Lyrics Meaning

घालीन लोटांगण मराठी अर्थ : Ghalin Lotangan Lyrics Meaning

 Ghalin Lotangan Lyrics Meaning : घालीन लोटांगण अर्थ

 घालीन लोटांगण ही प्रार्थना आहे. आपण ही प्रार्थना कोणतीही आरती झाल्यावर करतो.

 बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. 

घालीन लोटांगण ही गणपतीची आरती आहे, असा बऱ्याच जणांचा समज आहे.

तर तसे नाही, ही प्रार्थना आहे कृष्ण देवाला केलेली. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.

घालीन लोटांगण ही प्रार्थना कोणी एकाने लिहिले नाही.

तर तो संच आहे काही वेग वेगळ्या ओळींचा. ह्या ओळीं वेग वेगळ्या श्लोकातून घेण्यात आल्या आहेत.

घालीन लोटांगण मधील पहिल्या ४ ओल्या या संत नामदेव यांनी लिहिल्या आहेत.

तसेच त्या नंतरच्या ओळीं या शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्र, श्रीमदभगवत पुराण आणि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहेत.

ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

 पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

 वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.

पाहूया प्रत्येक कडवे अर्थासह

“घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |

भावे ओवाळीन म्हणे नामा |”

वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

अर्थ..

कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.

“त्वमेव माता च पिता त्वमेव |

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |

त्वमेव सर्व मम देव देव |”

हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे.

हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ..

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.

“कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||”

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ..

श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

“अच्युतम केशवम रामनारायणं |

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |

जानकी नायक रामचंद्र भजे ||”

वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ..

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.

हरे राम हरे राम |

राम राम हरे हरे |

हरे कृष्ण हरे कृष्ण |

कृष्ण कृष्ण हरे हरे |

तसेच “हरे राम हरे कृष्ण” हा सोळा अक्षरी मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे.

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही.

हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. 

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे.

तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे.

म्हणूनच बघा कोणत्याही देवाची आरती असो,शेवटी आपण घालीन लोटांगण ही प्रार्थना करतोच.

Leave a Reply