गायत्री मंत्र : Gayatri Mantra
गायत्री मंत्र:Gayatri Mantra

गायत्री मंत्र : Gayatri Mantra

गायत्री मंत्राचा अर्थ

गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (असे शब्द किंवा वाक्य जे आपल्या इष्ट किंवा कोणत्या देवाला प्रसन्न करण्यासाठी वापरतो.) आहे.
ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते.
ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे.
गायत्री मंत्र मध्ये 24 अक्षर आहेत. हे 24(८+८+८ योग) अक्षर शक्ती – सिद्धी चे प्रतीक आहेत.

मूळ गायत्री मंत्र :

“ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। ”

गायत्री महामंत्र :

यजुर्वेदतील मंत्र ‘ॐ भूर्भूवः स्वः’ मूळ गायत्री मंत्रास जोडून गायत्री महामंत्र ह्या प्रमाणे होतो:

“ ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। ”

ओंकार ला प्रणव असं म्हटलं जातं.
तीन ओंकार जोडून ‘त्रिप्रणव गायत्री मंत्र’ तयार होतो, ज्याला अतिशय शक्तिशाली मानले जाते.

“ ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात् ॐ। ”

मूळ गायत्री मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते (सृष्टिकर्ता प्रकाशमान परामात्मा चे तेज); त्याचे आम्ही ध्यान करतो.

तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.

किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. अश्या परमात्याचे तेज आमच्या विचारांना प्रेरणा देवो.

Leave a Reply