मूळ संपूर्ण गणेश आरती : Original Complete Ganesh Aarti
गणेश हा बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंंभाचे हिंदु दैवत आहे.
पुण्यातील अष्टविनायकांमधील एक, मयुरेश्वर, ह्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदास ह्यांना मिळाली असे मानले जाते.
ही आरती जोगिया(संगीतातील एक राग) ह्या रागात रचली आहे.
आपण गणेश आरतीचे फक्त 2 कडवे म्हणतो. मूळ आरतीचे ७ कडवे आहेत.
boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones with Mic(Black)१७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी ही गणेश आरती रचली आहे.
संपूर्ण गणेश आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!