श्री दत्तात्रेय
श्री दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुढे पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झालेले आढळतात.
मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.
अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचे पुत्र दत्तात्रेय यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ होते.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार हे तिन्ही भाऊ दत्त, सोम आणि दुर्वास हे विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात.
पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेऊन त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले.
दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
१] दत्त: दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा.
प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो.
यावरून ‘आपल्यात देवआहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू.
२] अवधूत: जो अहं धुतो, तो अवधूत! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना?
खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो.
हाच आपला अहंकार आहे.
श्री दत्त देवाला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्टकरण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे.’
३] दिगंबर: दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहेअसा!
जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे.
तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल.
श्री दत्तात्रेय ध्यानातील प्रतीकात्मकता
तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्री दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप अवतार आहे.
४] गाय: दत्ताच्या मागे असलेली गायही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे.
हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते. कामधेनूआपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
५] ४ श्वान : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे.
दत्तसंप्रदायावर प्रारंभी नाथसंप्रदायाचा प्रभाव होता.
भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत.
नाथसंप्रदायात ‘आदिगुरु’चे स्थान पावलेला महायोगी ‘दत्तात्रेय’ आपापत:च हे स्वरूप पावला असावा.
६] औदुंबर वृक्ष: दत्ताचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे. दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात
7]सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले.
तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात, ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याचे ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल.
विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते.
8] झोळी: ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.
9] वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकाविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ या श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राचा गर्भितार्थ
या मंत्रा मध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान.
मी देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे. निर्विकार आहे. अनंदरूप आहे.
पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.
दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे.
आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रम्हच आहे. परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत.
त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.
श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे.
श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना संबोधन केले आहे.
चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा.
मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया.
मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.तो भ्रम नाहीसा करा.
अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.