शुक्राचार्य  मंदिर : Shukracharya Temple
शुक्राचार्य मंदिर- shukracharya Temple

शुक्राचार्य मंदिर : Shukracharya Temple

शुक्राचार्य मंदिर – Shukracharya Temple

शुक्राचार्य मंदिर Shukracharya Temple हे शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर अहमदनर जिल्ह्यात कोपरगाव येथे आहे..

गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य ऊर्फ भार्गव (‘असुराचार्य’) यांचे कर्मस्थान आहे.

सध्या हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात येते.

दैत्यागुरू शुक्राचार्य इथेच वास्तव्यास होते. संजीवनी मंत्र मिळवण्यासाठी तपश्चर्या त्यांनी याच ठिकाणी केली असा पुराणात उल्लेक्ष आहे.

त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करत असत.

देवांना त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करणे कठीण झाले दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना अशक्य झाले.

बृहस्पतींनी देवांना असे सांगितले की, हा संजीवनी मंत्र लोप पावला तर मृत झालेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत.

तो मंत्र लोप करण्यासाठी देवांनी बृहस्पती यांना विनंती केली .

त्यावेळी त्यांनी स्वतः च्या पुत्राला कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले.

कच जेथे संजीवनी विद्याप्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून ते शुक्राचार्य मंदिर होय,असे मानले जाते.

ते पूर्वी गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर होते व कच जेथे गुरू सेवेकरिता आला ते स्थान गोदावरीच्या पलतीरावर होते.

हे स्थान कचेश्वर मंदिर म्हणून (प्रतित्रंबकेश्वर) प्रसिद्ध आहे. ते शुक्राचार्य मंदिराच्या उत्तरपूर्व बाजूस असून तेथे शुक्राचार्य व कचेश्वर यांची एकत्रित पिंड आहे.

मंदिराच्या समोर श्रीविष्णू, गणपती मंदिर आहेत .

समोरच शुक्राचार्य यांनी काचला जिथे दीक्षा दिली ते संजीवनी पाराचे स्थान मंदिराच्या समोर आहे.

गुरूची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य कचासह रोज पलतीराहून ऐलतीरावर म्हणजे हल्लीच्या गुरू शुक्राचार्य मंदिराच्या स्थानावर नित्यनियमाने येत असत.

या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या- जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यानी आपल्या हाताचा कोपरा मारून नदीचा प्रवाह बदलला होता म्हणून या गावास कोपरगांव असे नाव पडले असे इतिहासात उल्लेख आहे.

ज्यावेळी अंधकासुरणे माता पार्वतीवर अनुरक्त होऊन मिळवण्यासाठी पुकारले होते.

त्यावेळी मेलेल्या दैत्याना शुक्राचार्य जिवंत करत.

तेव्हा शंकरान त्यांना गिळून टाकले होते शंभर वर्ष पोटात त्यांनी शंकराची स्तुती केली तेव्हा शंकराने त्यांना आपल्या शुक्राणू क्या रुपात बाहेर काढले .

त्यांनी ज्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं ते स्थान कोपरगाव आहे असे मान्यता आहे.

सर्व शिष्यांमध्ये कच अत्यंत भक्तिभावाने गुरूची सेवा करीत असल्याने तो सर्वात लाडका शिष्य होता.

ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे, त्यामुळे त्यांनी द्वेषापोटी कचास दोन वेळा मारून टाकले होते.

परंतु शुक्राचार्यांना देवयानी नावाची कन्या होती व तिचे कचावर जिवापाड प्रेम होते.

तिने कचास दोन वेळा वडिलांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करून घेतले. दैत्यांना ते सहन झाले नाही.

म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा कचास ठार करून त्याची राख केली व ती राख गुरू शुक्राचार्य यांना दारूच्या गलासात मिसळून पाजली..

कच दिसेना म्हणून देवयानी ने परत आपल्या पित्याला काचाला जिवंत करण्याचा हट्ट धरला.

परंतु शुक्रचाऱ्यांनी तिला घडलेला सर्व प्रसंग सांगितला .

त्यावेळी तिने पित्याला म्हणाली तुम्ही मला मंत्र शिकवा मी त्याने तुम्हाला जिवंत करेल.

त्यावेळी पुत्री प्रेमासाठी शुक्रचाऱ्यांनी तिला संजीवनी मंत्र शिकवला त्याच वेळी पोटात असलेल्या कच बे ती विद्या शिकून घेतली.

कच जिवंत होऊन शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत पावले.

परंतु देवयानीने संजीवनी मंत्राद्वारे पुन्हा त्यांना जिवंत केले.

ही घटना मंदिराच्या समोर संजीवनी पार येथे घडली असे मानले जाते.

संजीवनी मंत्र हा गुरू शुक्राचार्य, देवयानी व कच यांनी ऐकल्यामुळे तो षटकर्णी झाला व लोप पावला.

अशा तऱ्हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करण्याची शक्ती गुरू शुक्राचार्यामध्ये राहिली नाही.

देवांचे कार्य साध्य झाल्याने कच मूळ देवलोकी जाण्यास निघाला, परंतु आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास विवाह करण्याची याचना केली.

परंतु आपण दोघेही एकाच वडिलांच्या उदरातून बाहेर आल्याने आपले नाते गुरू बंधू-भगिनीचे झाल्याने मी तुझ्याबरोबर विवाह करू शकत नाही असे त्याने सांगितले.

या गोष्टीचा देवयानीला राग आला आणि देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्त करून चालला तिचा तुझ्यासह कुणालाही उपयोग होणार नाही.

देवयानीची शापवाणी ऐकून कचानेही देवयानीस शाप दिला की, तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणपुत्राशी होणार नाही.

पुढे ही शापवाणी खरी ठरली व तिचा विवाह क्षात्रकुळातील ययाती राजाशी झाला.

आजही गुरू शुक्राचार्याच्या स्थानावर मुहूर्त वेळ-नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता बाराही महिने विवाह सोहळे होतात.

पेशव्यांनी वाडय़ाच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्या बांधल्या.

दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तरपूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर येथे गुप्त रूपाने आले असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे.

महाशिवरात्र पर्व काळात येथे मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.

शुक्राचार्य मंदिराचा रामानुग्रह ट्रस्टच्या वतीने व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळातही येथे मोठे उत्सव होतात.

गुरू शुक्राचार्याची पालखी गंगाभेटीस , सीमोल्लंघनाच्या वेळी देवी मंदिरात नेण्याचा प्रघात येथे आहे.

https://amzn.to/4baKkTj

https://amzn.to/3SBKtbo

श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ : Shri Swami Samarth Mantra Jap Labh

Leave a Reply