श्री लक्ष्मीसूक्तम् : Shri Laxmi Sukta
।। श्री लक्ष्मीसूक्तम् ।।
पद्मानने पद्मऊरु पद्माक्षि पद्मसंभवे । तन्मे भजसि पद्माति येन सौख्यं लभाम्यहम् ॥
हे कमलवदने, कमलाप्रमाणे ऊरु असणाया कमलाक्षी, कमलजे, ज्याने मला सौख्य लाभेल असे मनेप्सित मला प्राप्त करून दे.
पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि । विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत् पादपद्मं मयि संनियत्स्व ।।
हे कमलवदने, पद्मिनी, कमलप्रिय, कमलाधिरुढे, विष्णुप्रिये, विधानुकूले देवी, तुझ्या मंगल चरणांचे माझ्या ठायी नित्य अधिष्ठान ठेव.
अश्वदायि, गोदायि धनदायै महाधने । धनं मे जुषतां देवी सर्व कामांश्च देहि मे ।।
अश्व, गाई, तसेच विविध ऐश्वर्य देणाऱ्या देवी, माझे गृह समृद्ध होवो. तू माझे सर्व मनोरथ पूर्ण कर.
पुत्र पौत्रं धनं धान्यं हस्तश्वाश्वतरी रवम् । प्रजानां भवसि माता आयुष्मंतं करोतु मे ।।
हे लक्ष्मी, तू सर्व प्रजेची माता आहेस, तू मला पुत्र, पौत्र, धन, धान्य, हत्ती, घोडे, गाई, रथ इत्यादी सर्व वैभव देऊन दीर्घायुषी कर.
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः । धनर्मिद्रो बृहस्पतिर्वरुणोधनमश्वना ।।
अग्नी, वायू, सूर्य, अष्टवसु, इंद्र, बृहस्पती, वरुण आणि अश्विनीकुमार या देवता धनरूप असून तुझीच रूपे आहेत.
वैनतेयं सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा । सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ।।
हे गरूडा, मी यज्ञात तयार केलेला सोमरस तू प्राशन कर आणि माझे इष्ट कार्य पार पाडण्याची कामगिरी पार पाड. सर्व देवांनी माझा सोमरस प्राशन करावा व माझे मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी मला सहाय्य करावे. हे सोमप्राशक वृत्रहत्या. गरूडासहित इंद्रा, तुला सोम अर्पण करणाऱ्यांना तू सोम आणि धन दे.
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभा मतिः । भवन्ति कृतपुण्यानाम् भक्त्या श्रीसूक्त जापिनाम् ।।
हे माते श्रीसूक्त भक्तीने जपणाऱ्या (म्हणणाऱ्या), तसेच ज्यांनी बरीच पुण्यकृत्ये केली आहेत, अशा भक्तांना क्रोध, मत्सर, लोभ, दुर्बद्धी उत्पन्न होत नाही…
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांकुशगंधमाल्य शोभे । भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् ।।
हे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली, अती शुभ्र वस्त्रे परीधान केलेली, गंध, पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणाऱ्या भगवती विष्णुवल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो.
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते । धान्यं धनं पशूं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।
हे माते, मला सर्वत्र विजय, वर्चस्व, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्ययुक्त शोभायमान स्वर्गादि लोक, तसेच विपुल धन, धान्य, पशुधन, पुत्रपौत्रादि संतती आणि शंभर वर्षांचे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे..
महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।
आम्ही महालक्ष्मीला जाणतो. आम्ही विष्णुपत्नीचे ध्यान करतो. ती लक्ष्मी आम्हाला सद्बुद्धी देवो.